Bus-Motor Accident Mahadeshwara Temple esakal
देश

Bus Accident : देवदर्शन करुन परतताना भीषण अपघात; बसच्या धडकेत सहा जणांचा जागीच मृत्यू

महाडेश्वराच्या दर्शनासाठी महाडेश्वर टेकडीवर गेले हे प्रवासी होते.

सकाळ डिजिटल टीम

महाडेश्वर टेकडीवरून मागून येणारी मोटार भरधाव वेगात येऊन बसला धडकली.

बंगळूर : रामनगर जिल्ह्यातील सातनूरजवळ केएसआरटीसी बस (KSRTC Bus) आणि मोटारची समोरासमोर धडक झाली आणि या भीषण अपघातात मोटारीमधील (Bus-Motor Accident) सहा जणांचा जागीच मृत्यू झाला.

केएसआरटीसी बस आणि मोटारमध्ये दुपारी चार वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. कनकपूर तालुक्यातील सातनूरजवळील केमाळे गेटजवळ हा अपघात झाला.

महाडेश्वर टेकडीवरून मागून येणारी मोटार भरधाव वेगात येऊन बसला धडकली. बसच्या चालकासह अनेक प्रवासी किरकोळ जखमी झाले. सातनूर पोलिस घटनास्थळी दाखल झाले.

महाडेश्वराच्या दर्शनासाठी महाडेश्वर टेकडीवर गेले हे प्रवासी होते. दर्शन करून परतत असताना हा अपघात झाला. नागेश, पुट्टाराजू, जोतिर्लिंगप्पा (मोटार मालक), गोविंदा आणि कुमार अशी मृतांची नावे आहेत. हे सर्व बंगळूर येथील आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Election News: महानगरपालिका निवडणुकीआधी मतदान केंद्रांत बदल; केंद्रे स्थलांतरित, कुठे आणि का? जाणून घ्या...

Jagdeep Dhankhar Health Update: माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड रूग्णालयात दाखल!, ‘वॉशरूम’मध्ये पडले होते दोनदा बेशुद्ध

AMIM-BJP Alliance : अकोटमध्ये 'एमआयएम-भाजप भाऊ-भाऊ'; आमदार साजिद खान पठाण यांनी पुराव्यासह केला पर्दाफाश!

Mangalwedha ST Depot : मंगळवेढा एसटी आगाराची जिल्ह्यात 'पहिली' झेप; १० लाखांच्या उत्पन्नासह सोलापूर जिल्ह्यात अव्वल!

Latest Marathi News Live Update : सटाण्यात अनैतिक मानवी व्यापाराचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT