Gadriwala Village in Hoshiarpur esakal
देश

300 फूट खोल बोअरवेलमध्ये पडून सहा वर्षाच्या चिमुरड्याचा मृत्यू

सकाळ डिजिटल टीम

ही घटना होशियारपूर जिल्हा मुख्यालयापासून 25 किमी अंतरावर आहे.

पंजाबमधील (Punjab) होशियारपूर (Hoshiarpur) येथील गदरीवाला गावात बोअरवेलमध्ये (Borewell) पडून सहा वर्षांच्या मुलाचा मृत्यू झालाय. भटक्या कुत्र्यापासून वाचण्याचा प्रयत्न करत असताना त्याचा पाय घसरून तो बोअरवेलमध्ये पडला. घटनास्थळी तातडीनं बचावकार्य सुरू करण्यात आलं. दरम्यान, बालकाला ऑक्सिजन पोहोचवून उत्खनन सुरू करण्यात आलं. बऱ्याच प्रयत्नांनंतर मुलाला बाहेर काढून रुग्णालयात दाखल केलं असता, त्याचा मृत्यू झालाय.

ही घटना होशियारपूर जिल्हा मुख्यालयापासून 25 किमी अंतरावर आहे. इथं 6 वर्षीय ऋतिक सुमारे 300 फूट खोल बोअरवेलमध्ये पडला होता. सुमारे 95 फूट खाली गेल्यानंतर चिमुरडा अडकला. याची माहिती मिळताच, बालकाला वाचवण्यासाठी बचावकार्य सुरू करण्यात आलं. बोअरवेलपर्यंत जाण्यासाठी बोगदा खोदण्यासाठी जेसीबी मशीनही तैनात करण्यात आलं होतं.

पंजाबमधील होशियारपूरमध्ये एक बोअरवेल उघडली होती, तेव्हा एका भटक्या कुत्र्यानं तेथून जाणाऱ्या मुलाचा चावा घेण्याचा प्रयत्न केला. चिमुरडा स्वत:ला वाचवण्याच्या प्रयत्नात धावत असतानाच त्याचा तोल सुटला आणि तो उघड्या बोअरवेलमध्ये पडला. यानंतर माहिती मिळताच बचावकार्यासाठी लष्कराला पाचारण करण्यात आलं. प्रशासनाचे अधिकारीही घटनास्थळी पोहोचले होते.

स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितलं की, 'रविवारी सकाळी 9 वाजता मुलगा बोअरवेलमध्ये पडला होता. बचाव कार्यादरम्यान मुलाला ऑक्सिजन देण्यात आलं. याचवेळी मशिनद्वारे उत्खनन सुरू करण्यात आलं. चिमुरडा 95 फूटांवर अडकला होता. मुलाला बाहेर काढण्यासाठी पाईपचाही वापर करण्यात आला होता. दरम्यान, ऋतिकला बाहेर काढलं तेव्हा तो बेशुद्ध अवस्थेत होता.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कॅब लवकर हवी? आता आधीच टिप देण्याचा खेळ संपला! सरकारचा Uber-Ola ला मोठा आदेश

Gelatin Blast: पुण्यातल्या कामगाराचं भयंकर कृत्य! कमरेला स्फोटकं बांधून सासरवाडीत पोहोचला, एक बटण दाबलं अन् सगळं संपलं

Onion Rate : मंचर बाजार समितीत कांद्याला दहा किलोस मिळाला ४११ रुपये उच्चांकी बाजार भाव

Sangli Accident: रेणावी घाटात काळाचा घाला! दोन एसटी बस समोरासमोर धडकल्या, तीन जणांचा मृत्यू, काही जखमी

Pune News : प्रशासनातील वाद चव्हाट्यावर! वरिष्ठ अधिकारी दुजाभाव करतात; महापालिका आयुक्तांकडे तक्रार

SCROLL FOR NEXT