smriti irani shared a special video with her husband on the 20th wedding anniversary 
देश

सहजीवनाची २० वर्ष; स्मृती इराणींच्या लग्नाचे फोटो पाहिलेत का?

शर्वरी जोशी

सोशल मीडियावर सर्वाधिक अॅक्टीव्ह असणाऱ्या राजकीय व्यक्तिमत्वामध्ये केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचं आवर्जुन नाव घेतलं जातं. स्मृती इराणी अनेकदा इन्स्टाग्राम, ट्विट यां सारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधत असतात. तर, काही वेळा त्यांच्या जीवनातील अनेक गोष्टीदेखील त्या शेअर करत असतात. अलिकडेच स्मृती इराणी यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून त्यांनी पती जुबीन इराणी यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. विशेष म्हणजे या व्हिडीओमध्ये त्यांनी जुबीन इराणी यांच्यासोबतचा २० वर्षातील जीवनप्रवास मांडण्याचा प्रयत्न केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी लग्नातील काही फोटोंचादेखील समावेश केला आहे.

स्मृती इराणी यांनी २००१ मध्ये  जुबीन इराणींसोबत लग्नगाठ बांधली. अलिकडेच त्यांच्या लग्नाला २० वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यामुळे या दिवसाची खास भेट म्हणून स्मृती इराणी यांनी जुन्या फोटोंचा कोलाज करत एक रोमॅण्टिक व्हिडीओ तयार केला आणि तो जुबीन इराणी यांना भेट म्हणून दिला.

इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये स्मृती इराणी आणि जुबीन इराणी यांच्या लग्नापासून ते आतापर्यंतच्या २० वर्षातील प्रवास सुंदररित्या रेखाटण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा व्हिडीओ शेअर त्यांनी लुडो चित्रपटातील हरदम हे गाणं बॅकग्राऊंडला दिलं आहे. मैत्री, मज्जा मस्ती आणि रोमांचकारी २० वर्ष, असं कॅप्शन त्यांनी या व्हिडीओला दिलं आहे.

"माझ्यासोबत कोणतीही व्यक्ती सहज राहू शकत नाही, ही गोष्ट मी कधीच स्वीकारली आहे. मी एक सामान्य गृहिणी नाही, कारण, मी कायम माझ्या स्वप्नांचा मागोवा घेत धावत राहिले. पण, या काळात कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी  तू कायम सगळी जबाबदारी घेत आलास. तुझे आभार मी कसे मानू?",अशी खास नोटही स्मृती इराणींनी जुबीन यांच्यासाठी लिहिली आहे.

दरम्यान, सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून आतापर्यंत त्याला १ लाखापेक्षा जास्त व्ह्युज मिळाले आहेत.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trump wishes Modi : ट्रम्प यांनी केला मोदींना फोन दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा अन् म्हणाले...

High Court Decision : उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय! अवैध विवाह संबंधातून जन्मलेल्या मुलाला वडिलांच्या मालमत्तेत वाटा मिळण्याचा हक्क

Athletics Championships: छत्रपती शिवाजी महाराज की जय! चीनमध्ये सर्वेश कुशारेची जागतिक मैदानी स्पर्धेत अभिमानास्पद कामगिरी

Israel-Gaza War: इस्राईलकडून गाझा शहरात लष्करी कारवाईला सुरुवात; नागरिकांना दक्षिणेकडे निघून जाण्याचं आवाहन

Devendra Fadnavis: ''मी शंभर रुपये द्यायला तयार आहे, पण...'' उद्धव ठाकरेंच्या भाषणावरुन फडणवीसांचं आवाहन

SCROLL FOR NEXT