viral video
viral video 
देश

मित्राच्या अंतिम यात्रेत मोर सहभागी, व्हिडिओ पाहून नेटकरी भावूक

सकाळ डिजिटल टीम

नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेणारा एक व्हिडिओ सध्या सोशल (social media viral video) मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये चक्क एक मोर (Peacock) मित्राच्या अंतिम यात्रेत (Funneral) सहभागी झाल्याचे दिसून आले आहे. सोशल मीडियावरील या व्हिडिओला नेटकऱ्यांनी प्रचंड प्रतिसाद दिला आहे. त्या व्हिडिओवर त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही दिवसांपूर्वी एका कासव आणि म्हशीचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्या व्हिडिओमध्ये पाठीवर पडलेल्या कासवाला म्हशीनं जीवदान दिल्याचे दिसून आले होते. आताच्या व्हिडिओनं नेटकरी भावून झाले आहेत. (Netizens Emotinal)

वनाधिकारी प्रविण कासवान यांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. त्या व्हिडिओमध्ये मित्राच्या अंतिम यात्रेमध्ये मोर सहभागी झाल्याचे दिसून आले आहे. त्यातून प्राणी मात्रांच्या अनोख्या माणूसकीचं दर्शन यानिमित्तानं झालं आहे. विशेष म्हणजे त्या अंतिम यात्रेमध्ये बाकी फारसं कुणी सहभागी झालेलं नाही. मात्र मोराच्या सहभागामुळे त्याची चर्चा सुरु झाली आहे. काल असाच माणूसकीचा प्रत्यय देणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (social media viral) झाला होता. त्यामध्ये 25 रुपयांच्या शेंगाची उधारी देण्यासाठी अमेरिकेवरून भाऊ बहिण भारतात आले होते. त्यांच्या या प्रामाणिकपणाची जोरदार चर्चा सध्या सुरु आहे.

आताच्या व्हायरल झालेल्या त्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती मोराला झोळी करुन घेऊन चालला आहे असे दिसते आहे. त्यावेळी त्यांच्यापाठोपाठ मोरही निघाला आहे. @Bishnoiofficiai ने शेयर केलेल्या त्या व्हिडिओला एक कॅप्शनही दिली आहे. त्यामध्ये त्यांनी लिहिलं आहे की, मित्रानं आमची साथ सोडली आणि आता तो वेगळ्या प्रवासाला निघून गेला आहे. त्याच्या जाण्याचे अतोनात दु:ख आम्हाला झाले आहे. त्या व्हि़डिओमध्ये जे पाहिलं त्यानं कमालीचा भावूक झालो आहे. राष्ट्रीय मोरराजाही यावेळी भावूक झाल्याचे दिसून आले आहे. त्यानं त्याच्या मित्राला भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. या व्हि़डिओला आतापर्यत हजारो व्ह्युज मिळाले आहेत. तर शेकडो लोकांनी त्याच्यावर कमेंटही केल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur : मणिपूरमधील 'त्या' महिलांना पोलिसांनीच केलं जमावाच्या स्वाधीन; CBI चार्जशीटमध्ये धक्कादायक खुलासा

Labour Day : कामगार दिन! प्रत्येकाला माहिती असायला हवे असे भारतातील 11 कायदे

Satara Lok Sabha : शरद पवारच माझे मुख्य प्रचारक; असं का म्हणाले खासदार उदयनराजे?

रोहित शर्मा-विराट कोहली आंतरराष्ट्रीय टी-२० ला ठोकणार रामराम, 2024 चे वर्ल्डकप शेवटचे- रिपोर्ट

Latest Marathi News Live Update : राम सातपुतेंच्या प्रचारसभेसाठी योगी आदित्यनाथ यांची आज सोलापुरात सभा

SCROLL FOR NEXT