Muslim Mosque Haveri esakal
देश

Karnataka : मुस्लिमांच्या घरांवर, मशिदीवर दगडफेक; पोलिसांकडून 15 जणांना अटक

कर्नाटकात काही मुस्लिमांच्या (Muslim) घरांवर आणि मशिदीवर (Mosque) दगडफेक झाल्याची बातमी समोर येत आहे.

सकाळ डिजिटल टीम

ही बाईक रॅली शांततेत पार पडली होती. मात्र, काही बदमाशांनी मशिदीजवळ येताच दगडफेक सुरू केली.

कर्नाटकात काही मुस्लिमांच्या (Muslim) घरांवर आणि मशिदीवर (Mosque) दगडफेक झाल्याची बातमी समोर येत आहे. ही घटना हावेरी जिल्ह्यातील आहे.

इथं हिंदू संघटना आणि कुरुबा समुदाय संघटनांनी रॅलीदरम्यान मुस्लिमांच्या घरांवर आणि मशिदीवर दगडफेक केली. त्यामुळं परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. या प्रकरणी पोलिसांनी 15 जणांना ताब्यात घेतलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी हिंदू संघटनांचे सदस्य क्रांतिकारक संगोळी रायण्णा यांच्या पुतळ्याला घेऊन बाइक रॅली काढत होते. ही रॅली मुस्लीम वस्तीतून जात असताना काही हल्लेखोरांनी घरांवर आणि मशिदीवर दगडफेक केली.

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार या प्रकरणाची माहिती देताना हावेरीचे एसपी शिवकुमार म्हणाले, ही बाईक रॅली शांततेत पार पडली होती. मात्र, काही बदमाशांनी मशिदीजवळ येताच दगडफेक सुरू केली. 9 मार्चलाही असंच प्रकरण समोर आलं होतं, असं त्यांनी सांगितलं. याआधीही जातीय वातावरण बिघडवण्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. गेल्या वर्षी गुरुग्राममध्ये एका मशिदीला लक्ष्य करण्यात आलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT