Belgaum Loksabha Election esakal
देश

Loksabha Election : लोकसभा निवडणुकीपूर्वीच मोठ्या हालचाली; काँग्रेस-भाजपात गेलेले 'हे' बडे नेते पुन्हा पक्षात परतणार?

‘घरवापसी’ संदर्भात आमदार लक्ष्मण सवदी यांच्या नावाची चर्चा आहे.

सकाळ डिजिटल टीम

मागील काही वर्षांमध्ये जिल्ह्यात खूप बदल घडले. आमदार रमेश जारकीहोळी यांनी भाजपात प्रवेश केला. तर लक्ष्मण सवदी यांनी कॉँग्रेसमध्ये प्रवेश केला.

बेळगाव : लोकसभा निवडणूक (Belgaum Loksabha Election) तयारीच्या निमित्ताने राजकीय पटलावर विविध चर्चा पुढे येऊ लागल्या आहेत. बेळगाव व चिक्कोडी मतदार संघात राष्ट्रीय पक्षांचे उमेदवार कोण असणार याबाबत संभाव्य उमेदवारांचा खल सुरू झाला असताना दुसरीकडे काही आमदारांच्या ‘घर वापसी’ची चर्चा आहे.

त्यामध्ये माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर (Jagadish Shettar) व माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी (Laxman Savadi) यांची नावे चर्चेत आहेत. देशात २०२४ मध्ये लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजणार आहेत. जिल्ह्यात बेळगाव व चिक्कोडी असे दोन मतदारसंघ येतात. या मतदारसंघात भाजपचे खासदार आहेत. पण, आगामी निवडणूक भाजपला आव्हानात्मक असेल.

विधानसभेला बहुमत मिळाल्याने कॉंग्रेसचा आत्मविश्‍वास वाढला आहे. लोकसभेमध्ये वीस जागांचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यासाठी तगड्या आणि तुल्यबळ उमेदवारांचा शोध सुरू आहे. सध्या बेळगावसाठी पालकमंत्री सतीश जारकीहोळी, प्रकाश हुक्केरी, लक्ष्मण सवदींची नावे चर्चेत आहेत. तसेच, ‘घरवापसी’मध्ये आमदार रमेश जारकीहोळी यांचेही नाव चर्चेत आहे.

बेळगावला मंगला अंगडी खासदार आहेत. चिक्कोडीला अण्णासाहेब जोल्ले. दोन्ही मतदार संघामध्ये भाजपचे खासदार असले तरी पक्षश्रेष्ठी आगामी निवडणुकीत त्यांची उमेदवारी कायम ठेवणार वा नव्या चेहऱ्याला संधी देणार, हे अद्याप स्पष्ट नाही. पण, या संदर्भात तर्कवितर्क लढविण्यात येत आहे.

‘घरवापसी’ संदर्भात आमदार लक्ष्मण सवदी यांच्या नावाची चर्चा आहे. तसेच जगदीश शेट्टर यांचे नाव चर्चेत आहे. यामुळे एकीकडे उमेदवारी संदर्भात चर्चा रंगली असताना माजी मंत्री आणि आमदार यांच्यात ‘घर वापसी’वर खल सुरू आहे.

जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलली

मागील काही वर्षांमध्ये जिल्ह्यात खूप बदल घडले. आमदार रमेश जारकीहोळी यांनी भाजपात प्रवेश केला. तर लक्ष्मण सवदी यांनी कॉँग्रेसमध्ये प्रवेश केला. लोकसभा निवडणुकीनिमित्त कॉँग्रेसकडून जारकीहोळी आणि भाजपकडून सवदींना साद घातली जात आहे, अशी चर्चा होती. पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्याकडे या संदर्भात विचारणा केल्यानंतर त्यांनी याची आपल्याला कल्पना नसल्याचे सांगितले. पण, विषय पक्षश्रेष्ठींच्या पातळीवरचा असल्याचे सांगून चेंडू टोलविला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT