Success Story esakal
देश

Success Story : KBC ज्युनिअरमध्ये त्याने जिंकले होते 1 कोटी, नंतर डॉक्टर अन् आता IPS, कोण आहे हा व्यक्ती?

2001 मध्ये चार्ट-बस्टिंग टेलिव्हिजन शोमध्ये हजेरी लावून तो नॅशनल सेंसेशन बनला होता

साक्षी राऊत

Success Story : जगात बऱ्याच व्यक्ती या ऑलराउंडरच्या श्रेणीत येतात. एकावेळी अनेक कामं त्यांना यशस्वीपणे जमतात. अशाच एका व्यक्तीबाबत आज आपण जाणून घेऊया. रवि मोहन सैनी या व्यक्तीची लाइफस्टाइल लहानपणापासून फार अॅक्टिव्ह आहे. 2001 मध्ये चार्ट-बस्टिंग टेलिव्हिजन शोमध्ये हजेरी लावून तो नॅशनल सेंसेशन बनला होता. तेव्हा तो केवळ 14 वर्षांचा होता. मात्र हा व्यक्ती नक्की कोण आहे याबाबत सविस्तर जाणून घेऊया.

एमबीबीएस केल्यानंतर डॉक्टर झालेल्या या कुशाग्र बुद्धीच्या मुलाने सिव्हील सर्व्हंट होण्यास पसंती दाखवली. नंतर ते तब्बल दोन वेळा विना कोचिंग UPSC परीक्षा क्रॅक केली. कोण आहे मोहन सैनी?

रवी मोहन सैनीने अमिताभ बच्चन यांनी होस्ट केलेला कौन बनेगा करोडपती ज्युनिअर हा गेम शो जिंकला. या शोमध्ये 15 कठीण प्रश्नांची उत्तरे देऊन त्याने 1 कोटी रुपये जिंकले. ठिकठिकाणी त्याच्या कुशाग्र बुद्धीचे कौतुक झाले होते. हा व्यक्ती परत एकदा चर्चेत आला तो 20 वर्षांनंतर, 2021 मध्ये जेव्हा तो गुजरातमधील एका शहराचा एसपी बनला तेव्हा त्याची परत एकदा चौफेर चर्चा झाली.

रवी हा लहानपणापासूनच एक कुशाग्र बुद्धीचा विद्यार्थी होता. तो शोमध्ये झळकला तेव्हा तो 10वीत होता. त्याला केबीसी शोमध्ये नशीब आजमावायचे होते आणि अमिताभला प्रत्यक्षात भेटायचे होते. त्या विजयाने त्याचा आत्मविश्वास वाढला.

रवी नेहमीच टॉपर होता. आणि त्याच्या याच गुणामुळे त्याने एमबीबीएस डॉक्टर ते आयपीएस ऑफिसपर्यंत प्रवास यशस्वीपणे पूर्ण केला. आज रवी मोहन सैनी IPS ऑफिसर आहेत. त्यांनी जयपूरच्या महात्मा गांधी मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएस पूर्ण केले. यूपीएससीच्या तयारीसाठी त्यांनी कोणत्याही कोचिंग क्लासची मदत घेतली नव्हती.

त्यांचे वडील नौदल अधिकारी होते. वडिलांकडून प्रेरणा घेऊन ते भारतीय पोलीस सेवेत (IPS) रुजू झाले. 2012 ची मुख्य परीक्षा ते पास करू शकले नाही. 2013 मध्ये त्यांची भारतीय टपाल विभागाच्या लेखा आणि वित्त सेवांसाठी निवड झाली. 2014 मध्ये, त्यांनी ऑल इंडिया रँक 461 सह परीक्षा उत्तीर्ण केली. मेडिकल इंटर्नशिप करत असताना त्यांनी यूपीएससी पास केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhanorkar Join BJP: रविंद्र चव्हाणांचा विराट शो! धानोरकरांचा भाजपात प्रवेश, काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंचा किल्ला कोसळला

मोदी सरकारचा मोठा निर्णय! Asia Cup 2025 स्पर्धेतील India vs Pakistan लढत होणार की नाही? फैसला झाला

‘धुरंधर’च्या टीमची तब्येत बिघडण्याचं खरं कारण समोर; सेटवरील जेवण नाही तर लेहमध्ये पसरलेलं मोठं फूड कंटॅमिनेशन

Stock Market Closing: शेअर बाजार वाढीसह बंद; सलग सहाव्या दिवशी तेजी, कोणते शेअर्स चमकले?

Bail Pola 2025: डिजेपासून बैलांना त्रास! शेतकऱ्यांना ‘ॲनिमल राहत’कडून १० सूचना

SCROLL FOR NEXT