RN Ravi 
देश

Tamil Nadu Governer Row: राज्यपालांनी तामिळनाडूचा केला वेगळाच उल्लेख! वाद चिघळल्यानं दिलं स्पष्टीकरण

तामिनाडूतील स्टॅलिन सरकार आणि राज्यपाल रवी यांच्यामध्ये नवा वाद रंगला आहे.

सकाळ डिजिटल टीम

तामिळनाडूत एका भलत्याच गोष्टीमुळं सध्या वाद निर्माण झाला आहे. एम. के. स्टॅलिन सरकार आणि राज्यपाल आर. एन. रवी यांच्यामध्ये हा वाद जुंपला आहे. राज्यपाल रवी यांनी तामिळनाडू राज्याच्या नावाचा उल्लेख वेगळ्याच नावानं केल्यानं हा वाद निर्माण झाला आहे. हा वाद चिघळायला लागल्यानं यावर आता राजभवनाकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. (Tamil Nadu Governor row N Ravi givevs explanation on mention different name of Tamil Nadu)

काय आहे वाद?

तामिळनाडूच्या राजभवानात ४ जानेवारी रोजी आयोजित कार्यक्रमात राज्यपालांनी तामिळनाडूचा उल्लेख तमिझगम असा केला होता. त्यांनी म्हटलं होतं की, "तामिळनाडूबाबत एक वेगळाच विचार विकसित झाला आहे. जेव्हा कोणतीही गोष्ट संपूर्ण देशात लागू होते तेव्हा तामिळनाडूचं उत्तर असतं 'नाही'. ही एक सवयच बनली आहे. यावर अनेक गोष्टी लिहिल्या गेल्या आहेत ज्या चुकीच्या आणि वाईट आहेत. हा विचार बदलायला हवा. खऱ्याचा विजय व्हायला हवा, यासाठी तमिझगम असं संबोधनंच जास्त योग्य ठरेल"

विधानसभेत तमिझगम शब्द वापरल्यानं झाला होता गोंधळ

यापूर्वी राज्यपाल आर. एन. रवी यांनी तामिळनाडूच्या विधानसभेत अभिभाषण करताना तामिळनाडूला तमिझगम असं संबोधलं होतं. यानंतर त्यांच्या या विधानावर सत्ताधारी पक्ष डीएमके आणि त्यांचा सहकारी पक्ष काँग्रेस आणि विदुथलाई चिरुथिगाल काची यांनी (VCK) विरोध करत गोंधळ घालायला सुरुवात केली होती. राज्यापालांनी त्यांनी गेट आऊटचे पोस्टर देखील दाखववले होते.

हे ही वाचा : दुधदुभते मुबलक हवे....मग हे नक्कीच वाचा

वाद चिघळत चालल्यानं राज्यपालांनी दिलं स्पष्टीकरण

तामिळनाडूला नवं संबोधन केल्याचा वाद चिघळायला लागल्यानं राज्यपाल एन. रवी यांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं की, ४ जानेवारी रोजी राजभवनात काश-तमिळ संगमम या संघटनेच्या स्वयंसेवकांना सन्मानित करण्यासाठी एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी ऐतिहासिक सांस्कृतीक बंधावर विचार करताना मी 'तमिझगम' असा उल्लेख केला होता. कारण हा इतिहासाशी जोडलेला संदर्भ होता आणि त्यावेळी कोणतंही तामिळनाडू राज्य नव्हतं. त्यामुळं ऐतिहासिक-सांस्कृतीक संदर्भात मी 'तमिझगम' असा उल्लेख केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Shirsat: अंबादास दानवेंनी लावलेली आग अन् फडणवीसांनी केलेला गेम, संजय शिरसाट कसे फसले?

Stock Market Closing: शेअर बाजार लाल रंगात; सेन्सेक्स-निफ्टी मोठ्या घसरणीसह बंद, कोणते शेअर्स वाढले?

IND vs ENG 3rd Test: जसप्रीत बुमराहने करेक्ट कार्यक्रम केला! बेन स्टोक्स, जो रूटचा चतुराईने उडवला त्रिफळा; वोक्सही OUT

Latest Marathi News Updates : पुण्यात महिलेच्या सूपमध्ये सापडले झुरळ

Beed Baby News: मृत घोषित केलेलं बाळ रात्रभर दुर्लक्षित; दुसऱ्या दिवशी बॅगमध्ये टाकून नेलं, कुदळ सापडेना म्हणून झाला उशीर अन्...

SCROLL FOR NEXT