Kashmir Tagret Killing News
Kashmir Tagret Killing News esakal
देश

'टार्गेट किलिंग'चं सत्र सुरुच; 2 वर्षांत पंडितांसह 3 हजार हिंदूंनी सोडलं काश्मीर

सकाळ डिजिटल टीम

जम्मू-काश्मीरमध्ये टार्गेट किलिंगच्या घटना थांबण्याचं नाव घेत नाहीयत.

जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir) टार्गेट किलिंगच्या घटना थांबण्याचं नाव घेत नाहीयत. येथील हिंदूंना दहशतवादी (Terrorist) सातत्यानं लक्ष्य करत आहेत. काश्मीरमध्ये हिंदूंवर होत असलेल्या हल्ल्यांच्या घटनानंतर गुरुवारी अनेक हिंदू आणि काश्मिरी पंडितांनी (Kashmiri Pandit) काश्मीर सोडलंय. यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. एकाच दिवसात काश्मिरातील तब्बल 1 हजार 800 पंडितांसह 3 हजारहून अधिक हिंदूंनी काश्मीर (Kashmir Tagret Killing News) सोडल्याचं वृत्त समोर आलंय. त्यामुळं काश्मिरातील हिंदू वस्त्या पुन्हा ओस पडू लागल्या आहेत.

गेल्या 3 दिवसांत 3 हिंदूंना ठार मारण्यात आलंय. यावर्षी खोऱ्यात आतापर्यंत 26 टार्गेट किलिंगच्या घटना घडल्या आहेत. एकामागून एक या घटनांनी 90 च्या दशकातील भयानक आठवणी पुन्हा ताज्या केल्या आहेत. दरम्यान, खोऱ्यातून काश्मिरी पंडितांचं (Kashmiri Pandit) पलायन पुन्हा एकदा सुरू झालंय. गेल्या 20 दिवसांपासून तीव्र निदर्शनं काश्मिरात टार्गेट किलिंग विरोधात कऱण्यात आली होती. सरकारकडंही मदतीची याचना करण्यात आली होती. हिंदू शिक्षिकेच्या हत्येनंतर बँक मॅनेजरच्या हत्येनं संपूर्ण काश्मिरातील हिंदू धास्तावल्याचं चित्र दिसून आलंय. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर तीव्र खदखद मांडली जात असताना केंद्री सरकारनं नेमकं काय प्रयत्न केलं? असा सवालही उपस्थित होतोय.

जून 2020 पासून ते 31 मे पर्यंत तब्बल 11 हिंदूंची हत्या काश्मिरात झालीय. दोन वर्षांपूर्वी 2020 मध्ये अनंतनागध्ये सरपंच अजय पंडिता याची हत्या करण्यात आली होती. तर, आता गेल्या आठवड्याभरात एका हिंदू शिक्षिकेसह एका बँक मॅनेजरच्या हत्येनं खळभल उडाली. काश्मिरात तब्बल 8 हजार कर्मचारी आहेत. त्यातील 1800 कर्मचारी आपल्या कुटुंबासह राहतात. काहींच्या कुटुंबात तीन तर काहींच्या कुटुंबात चार सहस्य आहेत. जवळपास तेराशे कर्मचाऱ्यांची व्यवस्था ही ट्रान्झिट कॅम्पमध्ये करण्यात आलेली होती. तर, बाकीचे कर्मचारी भाड्याच्या घरांत वास्तव्यास होते. मात्र, आता टार्गेट किलिंगच्या घटनांची वाढती दहशत पाहता केंद्र सरकार सुरक्षेच्या बाबतीत अपयशी ठरल्याची टीका होऊ लागलीय. यामुळंच 1800 हिंदू कुटुंबीयांनी काश्मीर सोडल्याचं कळतंय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : स्वाती मालीवाल प्रकरणी विभव कुमार यांचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज

Hair Care Tips : केसांसाठी फायदेशीर आहे हेअर स्पा, घरीच कसा करायचा ते जाणून घ्या!

Aye Haye Oye Hoye Viral Song: जे गाणं ऐकल्यानंतर नेटकऱ्यांनी कानावर ठेवले हात, त्याचं ओरिजनल व्हर्जन आहे भन्नाट

Indian Team Coach : द्रविड, लक्ष्मणनंतर ऑस्ट्रेलियाच्या या दिग्गजाचाही नकार; हेड कोच निवडताना बीसीसीआयची वाढणार डोकेदुखी?

Narayana Murthy: आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे नोकऱ्यांवर काय परिणाम होणार? नारायण मूर्तींनी दिले उत्तर

SCROLL FOR NEXT