Telangana Election 2023 esakal
देश

Telangana Assembly Elections 2023 : तेलंगणात काँग्रेसचा विजय निश्चित? पक्षाकडून आमदारांना बंगळुरूला हलवण्याची तयारी

पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल ३ डिसेंबर ला जाहीर होणार आहे.

रोहित कणसे

तेलंगणा विधानसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलमध्ये काँग्रेसला स्पष्ट आघाडी मिळताना दिसत आहे. त्यामुळे काँग्रेस पक्ष अलर्ट मोडवर गेल्याचे दिसून येत आहे. इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, चुरशीची लढत झाली तर आमदारांचा घोडाबाजार टाळण्यासाठी काँग्रेस आपल्या आमदारांना बेंगळुरू किंवा अन्य शहरात पाठवण्याच्या तयारीत आहे.

पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल ३ डिसेंबर ला जाहीर होणार आहे. २०१४ मध्ये तेलंगणाच्या स्थापनेपासून येथे बीआरएसची सत्ता आहे. यापूर्वीच्या संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने आंध्र प्रदेशचे विभाजन करून तेलंगण राज्याची निर्मिती केली होती.

तेलंगणा काँग्रेसचे अध्यक्ष रेवंत रेड्डी यांनी पक्षाच्या विजयाबद्दल खात्री व्यक्त केली आहे. मात्र, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आमदारांना दुसऱ्या ठिकाणी हलवण्याची तयारी अशून, त्यावर रविवारी निकाल लागल्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल. काँग्रेसला ७० जागा जिंकता आल्या नाहीत, तर आमदारांना बेंगळुरू किंवा अन्य शहरात हलवण्याचा विचार असल्याची माहिती समोर आली आहे. या लोकांना हॉटेल किंवा रिसॉर्टमध्ये ठेवले जाण्याची शक्यता आहे. '

तेलंगणात विधानसभेच्या एकूण ११९ जागा असून सरकार स्थापनेचा जादुई आकडा ६० आहे. अनेक एक्झिट पोलमध्ये काँग्रेसला किंचित आघाडी मिळताना दिसत आहे, तर काहींमध्ये पक्ष मोठ्या विजयाच्या दिशेने वाटचाल करत आहे. ही बाब लक्षात घेऊन काँग्रेस हायकमांडने आपले दोन समन्वयक ज्या विधानसभा मतदारसंघात आपले उमेदवार जिंकण्याची शक्यता आहे, तेथे पाठवले आहेत. निवडणूक अधिकाऱ्यांकडून विजयाचे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर त्यांना गुप्त ठिकाणी पाठविले जाऊ शकते.

रिपोर्ट्सनुसार कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार आमदारांना हलवण्याबबात मोठी भूमिका बजावू शकतात. यापद्धतीने त्यांनी यापूर्वीही भूमिका बजावली आहे. २०१८ मध्ये कर्नाटक विधानसभेत बहुमत चाचणीदरम्यान काँग्रेस आणि जेडीएसच्या आमदारांना सुरक्षित स्थळी पाठवण्यात आले होते. त्यामागे शिवकुमार यांनी पुढाकार होते. तेलंगणात काँग्रेसला ६३ ते ७९, बीआरएसला ३१-४७, भाजपला २-४ आणि एमआयएमला ५-७ जागा मिळण्याचा अंदाज इंडिया टीव्ही-सीएनएक्सने वर्तवला आहे.

जन की बात एक्झिट पोलनुसार काँग्रेसला ४८ ते ६४, बीआरएसला ४०-५५, भाजपला ७-१३ आणि एमआयएमला ४-७ जागा मिळण्याची शक्यता आहे. रिपब्लिक टीव्ही-मॅट्रिक्सने तेलंगणात काँग्रेसला ५८ ते ६८, बीआरएसला ४६ ते ५६, भाजपला ४-९ आणि एमआयएमला ५-७ जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला आहे. टीव्ही 9 भारतवर्षने काँग्रेसला ४९ ते ५९ जागा, बीआरएसला ४८ ते ५८ जागा, भाजपला ५ ते १० जागा आणि एमआयएमला ६-८ जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला आहे. न्यूज 24-टुडेच्या चाणक्यने काँग्रेसला ७१ जागा मिळून स्पष्ट विजय मिलेल असा अंदाज वर्तवला आहे, तर बीआरएसला ३३ आणि भाजपला ७ जागा मिळण्याचा अंदाज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-Russia Relations: ''भारत-रशिया मिळून दहशतवादाला चोख उत्तर देणार'', परराष्ट्र मंत्र्यांचा रशियातून इशारा

Farmer ID : फार्मर आयडी नोंदणीत गोंधळ; सातबारा एकाचा, आधार लिंकिंग दुसऱ्याचे!

MP Nilesh Lanke : पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्यावी; खासदार नीलेश लंके यांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

Maharashtra Latest News Update: विधीमंडळाच्या सार्वजनिक उपक्रम समितीची खोपोली ते कुसगाव या मिसिंगलिंक प्रकल्पास भेट

Mokhada News : जगण्यासाठी छळ, मरणानंतर यातना; मोखाड्यातील आदिवासींच्या नशिबाचे दुष्टचक्र

SCROLL FOR NEXT