Hermes 900 Starliner Esakal
देश

Hermes 900 Starliner: पाकिस्तान बॉर्डर होणार भक्कम; पहिले हर्मीस-900 स्टारलाइनर ड्रोन 18 जूनला लष्कराला मिळणार

Adani Defence Systems: अदानी डिफेन्सने संरक्षण विभाग आणि इस्रायलच्या एल्बिट सिस्टम्ससोबत भागीदारी केली आहे. या तिघांनी मिळून हर्मीस 900 आणि 450 च्या एअर फ्रेम्स बनवल्या आहेत.

आशुतोष मसगौंडे

भारतीय लष्कराला 18 जून रोजी पहिले हर्मीस-900 स्टारलाइनर ड्रोन मिळणार आहे. त्यामुळे पाकिस्तान सीमेवर पाळत ठेवण्याची लष्कराची क्षमता वाढणार आहे. हर्मीस-900 या ड्रोनला दृष्टी १० ड्रोन असे नाव देण्यात आले आहे.

अदानी डिफेन्स सिस्टिम हर्मीस-900 स्टारलाइनर ड्रोन लष्कर आणि नौदलासह भारतीय सैन्याला पुरवत आहे.

संरक्षण अधिकाऱ्यांनी सांगितले की, भारतीय लष्कराने ताब्यात घेतलेल्या दोन ड्रोनपैकी पहिले 18 जून रोजी हैदराबादमध्ये सुपूर्द केले जाणार आहे.

संरक्षण मंत्रालयाने सैन्याला दिलेल्या आपत्कालीन अधिकारांतर्गत स्वाक्षरी केलेल्या कराराचा हा भाग आहे. लष्कर आपल्या भटिंडा तळावर हे ड्रोन तैनात करेल जेथून ते पाकिस्तानच्या संपूर्ण पश्चिम सीमेवर लक्ष ठेऊ शकेल.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, पहिले हर्मीस-900 या वर्षी जानेवारीमध्ये भारतीय नौदलाकडे सुपूर्द करण्यात आले होते. लष्कराला आता दुसरे ड्रोन लवकरच मिळणार आहे. शिवाय तिसरे ड्रोन नौदलाला आणि चौथा लष्कराला पुरवले जाणार आहे.

भारतीय लष्कराने यापैकी दोन ड्रोन आणीबाणीच्या तरतुदींनुसार फर्मकडून मागवले आहेत. या तरतुदींनुसार, विक्रेत्यांकडून पुरवठा करण्यात येणारी यंत्रणा ६० टक्क्यांहून अधिक स्वदेशी असली पाहिजे आणि 'मेक इन इंडिया' अंतर्गत असावी.

भारतीय लष्कराकडून आधीच हेरॉन मार्क 1 आणि मार्क 2 ड्रोन वापरत आहे. याशिवाय दृष्टी-10 किंवा हर्मीस-900 ड्रोनचीही ऑर्डर देण्यात आली आहे.

अदानी डिफेन्सने संरक्षण विभाग आणि इस्रायलच्या एल्बिट सिस्टम्ससोबत भागीदारी केली आहे. या तिघांनी मिळून हर्मीस 900 आणि 450 च्या एअर फ्रेम्स बनवल्या आहेत.

हर्मीस-900 ड्रोनची खासियत म्हणजे ते 30 तासांपेक्षा जास्त काळ हवेत राहण्यास सक्षम आहेत. सहसा या ड्रोनचा वापर विविध लष्करी कारवायांसाठी केला जातो ज्यात टोही मोहीम तसेच हवाई बॉम्बहल्ला यांचा समावेश आहे. ते 30 हजार फूट उंचीवर उड्डाण करू शकते आणि 450 किलो पेलोड वाहून नेऊ शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Video : ''भारतात तुम्ही मला सुरक्षा देऊ शकत नाही का?'', राहुल गांधींची पोलिसांबरोबर बाचाबाची, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

हिंदूंची जमीन मुस्लिमांच्या नावे केल्याचे आरोप, महिला अधिकाऱ्याच्या निवासस्थानी छापे; ९० लाखांची रोकड अन् कोट्यवधींचं सोनं जप्त

Latest Marathi News Updates : ऑक्टोबरपासून रेल्वे तिकीट बुकिंगमध्ये मोठा बदल!

Mumbai Health Report: राज्यात पावसाळी आजारांचा कहर; मुंबईत सर्वाधिक रुग्णांची नोंद

ब्रिटिशांच्या १८८१ व करवीर संस्थानच्या १९०२ च्या गॅझेटिरमध्ये मराठा व कुणबी एकच, तरीही मराठा समाजाला झगडावं लागतय; कोल्हापुरात आंदोलन पेटणार

SCROLL FOR NEXT