देश

ओमिक्रॉनवर 1963 मध्येच आला होता पिक्चर? काय आहे नेमकं सत्य?

सकाळ डिजिटल टीम

भारतात कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरियंटच्या तीन रुग्णांची नोंद झाली आहे. ओमिक्रॉनबाबत सध्या देशात चिंतेचं वातावरण आहे. या दरम्यानच आता ओमिक्रॉनवरील एका चित्रपटाचं पोस्टर व्हायरल होऊ लागलं आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या पोस्टरवर असणारी टॅग लाईन लक्ष वेधून घेत आहे. 'ज्या दिवशी पृथ्वी स्मशानभूमीत बदलली!' अशी टॅग लाईन या पोस्टरवर आहे. एखादी विज्ञान-कथा असलेल्या चित्रपटाचे हे पोस्टर असूनत्यामध्ये दोन व्यक्ती आकाशाकडे पाहत आहेत. तसेच त्यांच्या मागे हाताचा रक्ताळलेला पंजा आहे ज्यावर एक मुंगी आहे. हे पोस्टर सध्या लक्ष वेधून घेतंय कारण याच चित्रपटाचं नावच 'द ओमिक्रॉन व्हेरियंट' असं आहे.

एकीकडे भारतात नव्हे तर जगभरातच ओमिक्रॉन व्हेरियंटची चर्चा असताना दुसरीकडे त्याच नावाच्या एका चित्रपटाचं पोस्टरदेखील व्हायरल होत असून चर्चेचा विषय ठरले आहे. हा चित्रपट 1963 मध्ये प्रदर्शित झाला असल्याची माहिती आहे. काही नेटकऱ्यांनी यावरुन कोरोना हे षडयंत्र असल्याच्या दाव्यांना खतपाणी घातलं आहे. कारण कोरोना हे षडयंत्र असल्याचा दावा अनेकजण अधूनमधून करत असतात. दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी देखील या चित्रपटाचं पोस्टर शेअर केलं आहे. तसेच कॅप्शनमध्ये लिहलंय की, विश्वास ठेवा की हा चित्रपट 1963 साली आला होता. त्याची टॅगलाईन पहा.

दरम्यान, ‘द ओमिक्रॉन व्हेरिएंट’ नावाचा चित्रपट अस्तित्वातच नाही. या अस्तित्वात नसलेल्या चित्रपटाची जाहिरात करणारं हे पोस्टर बनावट आणि फोटोशॉप केलेलं आहे. याचा वापर कोरोना हे षडयंत्र असल्याच्या अफवांना अधिक उत्तेजण देणारं आहे. आयरिश दिग्दर्शक बेकी चीटल यांनी हे पोस्टर तयार केलं आहे. त्यांच्या १९७४च्या Sucesos en la cuarta fase (फेज ४) नावाच्या स्पॅनिश चित्रपटाचे पोस्टर एडिट करून बनावट The Omicron Variant पोस्टर तयार केलं आहे, अशी माहिती आहे. स्पॅनिश पोस्टरवरील टॅगलाइनचे भाषांतर “The Day The Earth was turned into a cemery!” असं आहे. चीटल यांनी ट्विटरवर सांगितलंय की हे पोस्टर खोटं आहे, जे फक्त करमणुकीसाठी तयार करण्यात आलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today : काल सोनं स्वस्त झालं म्हणून खरेदीचा विचार करताय? तर थांबा! आजचा भाव पाहा मग ठरवा...

Malegaon Municipal Election : मालेगावात भाजपची एमआयएमशी छुपी युती; समाजवादी पक्षाच्या नेत्याचा सनसनाटी आरोप, भाजप जिल्हाध्यक्ष म्हणाले....

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींची संक्रांत होणार गोड! ४ दिवसात जमा होणार ३ हजार... अधिकृत घोषणा!

Santosh Deshmukh Case : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी २३ जानेवारीला

Vashi Crime : ‘तुझाही संतोष देशमुख करू’ म्हणत सरपंचाला मारहाण; पवनचक्कीच्या कामावरून घडली घटना

SCROLL FOR NEXT