Hindalga Jail Nitin Gadkari esakal
देश

मोठी बातमी! नितीन गडकरींचं प्रकरण ताजं असतानाच हिंडलगा कारागृहात बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी, बेळगावात खळबळ

Bomb Threat: हिंडलगा कारागृहात बॉम्बस्फोट आणि कारागृह अधिकाऱ्यांवर हल्ला करण्याची धमकी अज्ञातांनी दिली आहे.

सकाळ डिजिटल टीम

बंगळूर येथील कारागृह व फिर्यादी शेष यांचे निवासस्थान बॉम्बस्फोटने उडविणार असल्याची धमकी दिली.

बेळगाव : हिंडलगा कारागृहात बॉम्बस्फोट आणि कारागृह अधिकाऱ्यांवर हल्ला करण्याची धमकी अज्ञातांनी दिली आहे. यामुळे बेळगाव ग्रामीण पोलिसांत (Belgaum Rural Police) अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

केंद्रीय राष्ट्रीय महामार्ग आणि रस्ते मंत्री नितीन गडकरी यांना फोनद्वारे जीवे मारण्याची धमकी दिल्याचे प्रकरण ताजे असताना बंगळूरहून अज्ञातांनी धमकी देऊन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

पोलिसांनी सांगितले की, उत्तर विभाग बेळगाव कारागृह उपमहानिरीक्षक (डीआयजीपी) टी. पी. शेष यांना अज्ञात व्यक्तीकडून ८ ऑक्टोबरला दुपारी सव्वा चारच्या सुमारास वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकाद्वारे संपर्क साधून हिंडलगा कारागृहातील मुख्य निरीक्षक जगदीश गस्ती आणि बंगळूर येथील मुख्य निरीक्षक एस.एम.गोठे माझ्या परिचित आहेत.

बंगळूर येथील कारागृह व फिर्यादी शेष यांचे निवासस्थान बॉम्बस्फोटने उडविणार असल्याची धमकी दिली. हिंडलगा कारागृहात दंगल घडविण्यासह फिर्यादी शेष यांच्यावर हल्ला करणार आहे, अशी धमकी दिली आहे. यामुळे आज बेळगाव ग्रामीण पोलिसा हिंडलगा कारागृहाचे उपमहानिरीक्षक टी. पी. शेष यांनी फिर्याद दिली.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूर येथील कार्यालयात फोन करून बेळगाव हिंडलगा कारागृह आणि बंगळूरमधून एकदा असे मिळून दोनवेळा जिवे मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर मध्यंतरी अधिकाऱ्यांवर लाचखोरीबाबत आरोप केले होते. आता कारागृहाला बॉम्बस्फोटने उडविण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पातळीवर याची चौकशी सुरु झाली आहे. अधिकाऱ्यांनी चौकशी सुरु केल्याची माहिती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Adityanath Mobile Number: अधिकारी काम करत नाहीत? CM योगींकडे करा थेट तक्रार! मुख्यमंत्री आदित्यनाथ यांचा मोबाईल नंबर

Harbhajan Singh : रोहित शर्माला ODI कर्णधारपदावरून हटवल्याने हरभजन सिंग खवळला, शुभमन गिलबाबत म्हणाला...

Marathi Movie : तरूणाईला प्रेमाचा जादुई अनुभव देणारं ‘ये ना पुन्हा’ गाणं प्रदर्शित!

Ajit Agarkar: रोहित शर्मासाठी परतीचा प्रवास सुरू? कर्णधारपदावरून दूर करण्याची माहिती दिली होती,आगरकर

Kolhapur Bhishi Scam : विश्वासू मित्र म्हणून भिशी भरायला दिली, अन् ४० महिलांना पती, पत्नीने २५ लाखांना गंडवलं...; कोल्हापुरातील घटना

SCROLL FOR NEXT