Accident on Chikkodi-Ankali Road esakal
देश

Road Accident : यात्रा करुन घरी परतणाऱ्या तीन मित्रांना मालवाहतूक गाडीनं चिरडलं; तिघांचा दुर्दैवी अंत

हे तिघे युवक संध्याकाळी चिक्कोडीला गेले होते.

सकाळ डिजिटल टीम

रात्री परत येत असताना तिघेही एकाच मोटारसायकलवरून केरूरकडे जात होते. यावेळी अंकलीकडून मालवाहू मोटार येत होती. या दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली.

चिक्कोडी : मालवाहतूक मोटार व मोटारसायकल यांच्यात झालेल्या अपघातात (Road Accident) तिघे तरुण ठार झाल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. हा अपघात चिक्कोडी-अंकली रस्त्यावर बसवनाळगड्डेजवळ झाला.

प्रशांत भैरू खोत (वय २२, रा. रुपिनाळ, ता. चिक्कोडी), सतीश कल्लाप्पा हिरेकोडी (वय २३, रा. केरूर, ता. चिक्कोडी) आणि यलगौडा चंद्रकांत पाटील (वय २२, रा. बेळगाव) अशी ठार झालेल्यांची नावे आहेत. याबाबत माहिती अशी, तिघे तरुण केरूर येथून चिक्कोडीला गेले होते. मंगळवारी गावात त्रैवार्षिक यात्रा होती.

त्यामध्ये यलगौडा व सतीश हे पाहुणे तर प्रशांत हा मित्र आहे. हे तिघे युवक संध्याकाळी चिक्कोडीला गेले होते. रात्री परत येत असताना तिघेही एकाच मोटारसायकलवरून केरूरकडे जात होते. यावेळी अंकलीकडून मालवाहू मोटार येत होती. या दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली.

बसवनाळगड्डे येथे हा अपघात झाला. त्यात प्रशांत व सतीश हे दोघे जागीच ठार झाले तर यलगौडा पाटील याला रुग्णालयामध्ये दाखल करण्यासाठी नेताना वाटेत त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच चिक्कोडी वाहतूक पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक अम्मीनभावी यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. या घटनेची नोंद चिक्कोडी वाहतूक पोलिस ठाण्यात झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युरोपात ३०-३५ डिग्री सेल्सिअसने हाहाकार, भारतात ४५वर पारा पोहोचूनही रस्ते वितळत नाहीत; कारण काय?

५ सामने, ३० चौकार, २९ षटकार अन् ३५५ धावा... Vaibhav Sooryavanshi ची इंग्लंडमधील कामगिरी भारताला विचार करायला लावणारी..

Small Savings Schemes: PPF आणि पोस्ट ऑफिस FD गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! पुढील 3 महिन्यांसाठी व्याजदर जाहीर; पाहा नवे दर

Ramtirth Waterfall : पांढराशुभ्र फेस अन् खळखळणारा आवाज! आंबोलीतील प्रसिद्ध रामतीर्थ धबधबा प्रवाहित; पावसाच्या पाण्यामुळं खुललं सौंदर्य, पर्यटकांची गर्दी

Europe Heatwave: युरोपमध्ये उष्णतेचा कहर! रस्ते वितळले, लोखंडी ट्रॅक वाकले, हजारो नागरिक रुग्णालयात...भयानक व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT