Tipra Motha Party, Tripura Assembly Election 2023 esakal
देश

Tripura Election : पहिल्यांदाच निवडणूक लढवणाऱ्या TMP चा जबरदस्त करिष्मा; काँग्रेस-डाव्या आघाडीला मोठा धक्का

त्रिपुरामध्ये पहिल्यांदाच टिपरा मोथा पार्टी (TMP) विधानसभा निवडणूक लढवत आहे.

सकाळ डिजिटल टीम

टिपरा मोथा पक्षाला टिपरा देशी पुरोगामी प्रादेशिक आघाडी म्हणूनही ओळखलं जातं.

Tipra Motha Party, Tripura Assembly Election 2023 : त्रिपुरामध्ये पहिल्यांदाच टिपरा मोथा पार्टी (TMP) विधानसभा निवडणूक लढवत आहे. 2021 मध्ये या पक्षाची स्थापना झालीये.

या पक्षाचं नेतृत्व त्रिपुराचे माजी राजवंशी प्रद्योत बिक्रम माणिक्य देब बर्मा करत आहेत. आज (गुरुवार) जाहीर होत असलेल्या मतमोजणीच्या ताज्या ट्रेंडमध्ये टीएमपी काँग्रेस-डाव्या आघाडीला कडवी झुंज देताना दिसत आहे.

टिपरा मोथा पक्ष 42 जागांवर निवडणूक लढवत आहे. त्यांनी कोणत्याही पक्षाशी हातमिळवणी केलेली नाहीये. पक्षाचे प्रमुख देब बर्मा स्वतः निवडणूक लढवत नाहीयेत. ते म्हणतात, 'टिपरा मोथा हा एक छोटा पक्ष आहे. जो राजकारणाची व्यवस्था बदलण्यासाठी पारदर्शकतेवर विश्वास ठेवतो.' 2021 पासून त्रिपुरा आदिवासी क्षेत्र स्वायत्त जिल्हा परिषदेत टिपरा पक्षाची सत्ता आहे. त्रिपुरा विधानसभेच्या एकूण 60 जागांपैकी 20 जागा अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत.

टिपरा मोथा पक्षाला टिपरा देशी पुरोगामी प्रादेशिक आघाडी म्हणूनही ओळखलं जातं. याचं प्रमुख प्रद्योत बिक्रम माणिक्य देब बर्मा आहेत. माणिक्य बर्मा यांची 25 फेब्रुवारी 2019 रोजी त्रिपुरा प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. मात्र, काही महिन्यांतच त्यांनी काँग्रेस हायकमांडवर आरोप करत राजीनामा दिला. त्यानंतर तीन महिन्यांनी त्यांनी सामाजिक संस्था स्थापन केली.

5 फेब्रुवारी 2021 रोजी देब बर्मा यांनी स्वत:चा एक राजकीय पक्ष बनवला आणि 2021 च्या त्रिपुरा आदिवासी क्षेत्र स्वायत्त जिल्हा परिषद निवडणुकीत विजय मिळवला. INPT (Indigenous Nationalist Party of Twipra), TSP (Tipraland State Party) आणि IPFT 2021 मध्ये Tipra पार्टीमध्ये विलीन झालं.

जिल्हा परिषद निवडणुकीत 16 जागा जिंकल्या

त्रिपुरा आदिवासी क्षेत्र स्वायत्त जिल्हा परिषद निवडणुकीत टिपरा मोथानं 16 जागा जिंकल्या, तर त्याचा मित्रपक्ष INPT नं 2 जागा जिंकल्या. अशा प्रकारे परिषदेतील डाव्यांची 15 वर्षांची सत्ता संपुष्टात आली. राष्ट्रीय पक्षाशी युती न करता परिषदेत सत्ता टिकवून ठेवणारा टिपरा हा एकमेव प्रादेशिक पक्ष ठरला. त्रिपुरामध्ये सध्या भाजपचं सरकार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump solar tariff: गोड-गोड बोलून ट्रम्पचा भारताला झटका; सौरऊर्जेवर १२६ टक्के टॅरिफ, आता नेमके काय परिणाम होणार?

भरधाव थारची कारला धडक, एकाचा मृत्यू; तरुणी चालवत होती थार, अपघातानंतर सीट बदलली

T20 World Cup: यजमान श्रीलंकेचं भवितव्य आज ठरणार! न्यूझीलंडविरुद्ध रंगणार महत्त्वाचा सामना

'माझ्यावर होणाऱ्या टीकेवर...' समांथा प्रभूने सांगितला मानसिक आरोग्य जपण्याचा फॉर्म्युला

Russia Ukraine Ceasefire : रशिया-युक्रेन युद्धबंदीच्या ठरावादरम्यान भारत अनुपस्थित, अमेरिकेनीही घेतला नाही सहभाग; झेलेन्स्कींना झटका !

SCROLL FOR NEXT