Vaishno Devi Temple esakal
देश

वैष्णो देवीच नव्हे, तर भारतासाठी 1 जानेवारीचा इतिहास भयंकर आहे!

Balkrishna Madhale

भारतासाठी नवीन वर्षाची सुरुवात दुःखद बातमीनं होण्याची ही पहिलीच वेळ नाहीय.

New Year January Incident : 2021 वर्ष संपून आज 2022 या नव्या वर्षाला सुरुवात झालीय. परंतु, भारतासाठी हे नवीन वर्ष अत्यंत दुःखदायक आहे. कारण, जम्मूच्या कटरा (Jammu Katara) मधील वैष्णो देवी मंदिर (Vaishno Devi Temple) परिसरात रात्री 2 वाजताच्या सुमाराम चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत 13 लोकांचा मृत्यू झाला, तर या दुर्घटनेत अनेक जण जखमी झाले आहेत. नवीन वर्षाच्या निमित्तानं इथं दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर भाविकांनी गर्दी केली होती. भारतासाठी नवीन वर्षाची सुरुवात दुःखद बातमीनं होण्याची ही पहिलीच वेळ नाहीय. याआधीही अशा बऱ्याच घटना घडल्या आहेत. चला तर जाणून घेऊ, कोणत्या आहेत त्या दुःखद घटना..

1978 मध्ये एअर इंडियाचं विमान अरबी समुद्रात कोसळलं

सन 1978 मध्ये या दिवशी एअर इंडियाचं विमान (Air India Aircraft) एका मोठ्या अपघाताला बळी पडलं. 213 प्रवाशांसह विमान अरबी समुद्रात गाडलं गेलं होतं. मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर, काही वेळातच विमानात तांत्रिक बिघाड झाली, त्यामुळं विमान अरबी समुद्रात गाडलं गेलं. त्यावेळी विमानात 190 प्रवाशांसह 23 क्रू मेंबर्स होते.

1992 मध्ये मुंबईत 91 जणांचा मृत्यू

सन 1992 मध्ये मुंबईत नववर्षाची संध्याकाळ साजरी करताना 91 जणांचा मृत्यू झाला होता. सर्व लोकांनी मद्य प्राशन केलं होतं, त्यामुळं रात्री त्यांची प्रकृती बिघडली आणि 1 जानेवारीला सकाळी लोकांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली. या दुःखद घटनेत 91 जणांचा बळी गेला होता.

मांढर देवी मंदिरातील चेंगराचेंगरीत 250 हून अधिक भाविकांचा मृत्यू

भारत नेहमीच विविध धर्म आणि धार्मिक श्रद्धांसाठी ओळखला जातो. हिंदू धर्मात सुमारे 33 कोटी देवता आहेत. ज्यांची त्यांच्या समजुतीनुसार पूजा केली जाते. त्याचप्रमाणं 25 जानेवारी 2005 रोजी पौष पौर्णिमेच्या दिवशी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात एका टेकडीवर असलेल्या मांढर देवीच्या (Mandhar Devi Temple) दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. 24 तास चालणाऱ्या या उत्सवात सहभागी होण्यासाठी देशाच्या विविध भागातून भाविकांनी हजेरी लावली होती. मांढर देवीच्या पूजेदरम्यान प्राण्यांचा बळी दिला जातो आणि नारळही फोडले जातात. एका रिपोर्टनुसार, दुपारी मंदिरात खूप गर्दी होती. यादरम्यान काही भाविकांचे पाय मंदिराच्या पायऱ्यांवरुन घसरले. त्या पायऱ्या नारळाच्या पाण्यामुळं ओल्या झाल्या होत्या. याच दरम्यान सिलेंडरचा स्फोट झाल्यानं आजूबाजूच्या दुकानांना आग लागली. यात हजारो भाविकांच्या गर्दीत अचानक चेंगराचेंगरी होऊन 250 हून अधिक भाविकांचा मृत्यू झाला, तर 200 हून अधिक भाविक जखमी झाले.

1954 मध्ये कुंभमेळ्यात चेंगराचेंगरी

अशीच एक घटना 1954 मध्ये कुंभमेळ्यात चेंगराचेंगरी झाल्यामुळं घडली होती. ही घटना 3 फेब्रुवारी 1954 रोजी उत्तर प्रदेश राज्यातील अलाहाबादमध्ये घडली होती. मौनी अमावस्येचा दिवस हा मुख्य स्नानाचा दिवस होता. यामध्ये लाखो भाविक सहभागी झाले होते. हा मेळा स्वातंत्र्यानंतरचा पहिला कुंभमेळा होता. एका अहवालानुसार, चेंगराचेंगरीमुळं सुमारे 800 लोकांचा मृत्यू झाला होता. 200 लोक बेपत्ता तर 2000 लोक जखमी झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT