Indian Train
Indian Train  Esakal
देश

IRCTC! रेल्वेची नवी पेमेंट सेवा, जाणून घ्या कसा मिळणार फायदा

सकाळ डिजिटल टीम

IRCTC News : रेल्वे प्रवाशांसाठी फायद्याची बातमी आहे. भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी एक नवीन सुविधा सुरू केली असून, आता प्रवाशांना क्यूआर कोड (QR Code) आणि यूपीआय पेमेंटद्वारे (UPI Payment) ट्रेनचे तिकीट सहज खरेदी करता येणार आहे. यामुळे सुविधेमुळे आता प्रवाशांना तिकीट काढणे अधिक सोपे होणार आहे. ही सुविधा ज्या ठिकाणी ऑटोमॅटिक तिकीट व्हेंडिंग मशीन (ATMV) सुविधा आधीपासून अस्तित्वात आहे अशाच स्टेशनवर ही सुविधा उपलब्ध असणार आहे. वाढत्या ऑनलाइन सेवा पाहता रेल्वेने ही सुविधा सुरू केली आहे. (Train Tickets Can Booked Through QR Code)

ऑटोमॅटिक तिकीट वेंडिंग मशीन कसे करते कार्य

वास्तविक, ऑटोमॅटिक तिकीट वेंडिंग मशीन हे एटीएमसारखे असतात. याआधी याचा वापर फक्त लोकल किंवा प्लॅटफॉर्म तिकीट काढण्यासाठी केला जात होता. मात्र, आता या मशीनच्या सहाय्याने लांबच्या प्रवासासाठीही तिकीट काढता येणार आहे. यासाठी दक्षिण रेल्वेतर्फे काही सुधारणा करण्यात येत आहे. www.irctchelp.in ने दिलेल्या माहितीनुसार, आता ATMV च्या मदतीने प्लॅटफॉर्म तिकीट तसंच प्रवासाचं तिकीटही उपलब्ध करून दिलं जाणार आहे. यासाठी प्रवाशांना तिकिटासाठी QR कोड स्कॅन करावा लागणार असून UPI द्वारे याचे पैसे अदा करता येणार आहेत.

कसे काढू शकाल तिकीट

ज्यावेळी तुम्ही या मशीनच्या सहाय्याने तिकीट काढण्यासाठी जाल त्यावेळी तुम्हाला मशीनवर एक QR कोड फ्लॅश होताना दिसेल, तो तुम्हाला स्कॅन करावा लागेल. तिकिटाचे पैसे तुम्ही कोणत्याही UPI अ‍ॅपच्या मदतीने देऊ शकता.

पेमेंट कसे होणार

यापूर्वी रेल्वेतर्फे स्मार्ट कार्ड जारी केले जात होते, जे ATMV मध्ये तिकीट किंवा पास खरेदी करण्यासाठी वापरले जाऊ शकत होते. पण आता रेल्वेने सुरू केलेल्या नव्या सुविधेनंतर प्रवाशांना UPI अ‍ॅपवरूनही ट्रेनचे तिकीट खरेदी करता येणार आहे. तसेच स्मार्टकार्डद्वारे तिकीट खरेदी करण्याची सुविधा पूर्वीप्रमाणेच सुरू राहणार आहे. म्हणजेच ज्याप्रमाणे प्रवाशी स्मार्ट कार्डसाठी डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डद्वारे पैसे देऊ शकत होते, त्याचप्रमाणे ते UPI प्लॅटफॉर्मला कार्डशी जोडून पेमेंट करू शकणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Lok Sabha: "विशाल पाटलांवर शिवसेनेचा अन्याय"; भाजपचे केंद्रीय मंत्री काय बोलून गेले...

Raghuram Rajan: संपत्ती वितरणावर रघुराम राजन यांचे वक्तव्य चर्चेत; म्हणाले, ''श्रीमंतांवर कर...''

KKR vs DC : कोलकत्याच्या मार्गात दिल्लीचा अडथळा! सुनील नारायणचा पुन्हा दिसणार ‘वन मॅन शो’.... की जेक फ्रेसर मॅर्कगर्क घालणार तांडव

Latest Marathi News Live Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज सोलापुरात सभा

दहा मिनिटांमध्ये लिहिलेल्या मंगलाष्टका अन् मोहन जोशींचा किस्सा; 'असा' शूट झाला होता राधा-घनाच्या लग्नाचा एपिसोड

SCROLL FOR NEXT