देश

UGC NET परिक्षेसाठी नोंदणीचा आज शेवटचा दिवस; जाणून घ्या कशी कराल नोंदणी

सकाळ डिजिटल टीम

दि नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) मे महिन्यांत होणारी युजीसी नेट २०२१ परीक्षा घेणार आहे. यासाठी नोंदणी सुरु असून आज नोंदणीचा शेवटचा दिवस आहे. ज्या उमेदवारांना नेट परीक्षा द्यायची आहे त्यांना आजच ugcnet.nta.nic.in या वेबसाईटवर नोंदणी करता येणार आहे. ज्युनिअर रिसर्च फेलोशिप (जेआरएफ) आणि सहाय्यक प्राध्यापक या पदासाठीची  ही पात्रता परीक्षा आहे.

एनटीएकडून विविध तारखांना ही परीक्षा घेण्यात येणार आहे. २, ३, ४, ५, ६, ७, १०, १२, १४ आणि १७ मे रोजी विविध केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे. ऑनलाईन स्वरुपाची ही परीक्षा असून यामध्ये दोन पेपर असणार आहेत.
 
युजीसी नेट पेपर १

युजीसी नेट पेपर १ हा १०० गुणांचा पेपर असून यामध्ये ५० प्रश्न हे बहुपर्यायी असणार आहेत. तसेच या परीक्षेचा कालावधी तीन तासांचा आहे. ही परीक्षा दोन शिफ्टमध्ये होणार असून पहिली शिफ्ट ही सकाळी ९ ते दुपारी १२ त्यानंतर दुसरी शिफ्ट दुपारी ३ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत असणार आहे. ही परीक्षा केवळ कॉम्प्युटर बेस्ड मोडवर (सीबीटी) घेण्यात येणार आहे. 

युजीसी नेट पेपर २

युजीसी नेट पेपर २ हा २०० गुणांचा असणार आहे. यामध्ये १०० बहुपर्यायी प्रश्न असतील. या पेपरचा कालावधी तीन तासांचा असणार आहे. ही परीक्षा देखील दोन शिफ्टमध्ये होणार आहे. यामध्ये पहिली शिफ्ट सकाळी ९ ते दुपारी १२ वाजेपर्यंत तर दुसरी शिफ्ट दुपारी ३ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत असणार आहे. ही परीक्षाही कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट (सीबीटी) मोडवर घेण्यात येणार आहे. 

या परीक्षेसाठी १००० रुपये शुल्क असून ते ३ मार्चपूर्वी भरावे लागणार आहे. त्यानंतर जर अर्जामध्ये काही चूक झाली असेल तर ती मार्च महिन्यातचं दुरुस्त करता येणार आहे. 

युजीसी नेट २०२१ परीक्षेसाठी खालील टप्प्यांनी करता येईल नोंदणी 

  • अधिकृत वेबसाईटला भेट द्या - cmat.nta.nic.in
  • सिलेक्ट - अॅप्लिकेश फॉर्म डिसेंबर २०२० सायकल (मे २०२१)
  • न्यू रजिस्ट्रेशन या बटणावर क्लीक करा आणि ब्रोशर डाउनलोड करा
  • ब्रोशरमध्ये दिलेल्या सूचना काळजीपूर्वक वाचा
  • तुमचा मोबाईल क्रमांक आणि ई-मेल आयडी देऊन नोंदणीसाठी पुढे
  • जा त्यानंतर तुम्हाला एक अॅप्लिकेशन क्रमांक मिळेल. 
  • यानंतर आवश्यक क्रेडेन्शिअलसह संपूर्ण अर्ज भरा
  •  यानंतर तुमची कागदपत्रे आणि फोटो अपलोड करा
  • घल्डागोऊनलोड झालेला अर्ज भविष्यातील कामकाजासाठी जपून ठेवा

भारत India

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: अखेर पडला राहूल गांधींचा हायड्रोजन बॉम्ब! मोबाईलवर OTP आले आणि काँग्रेसचे मतदार डिलीट झाले, कशी झाली वोट चोरी

Latest Maharashtra News Updates : महाराष्ट्रातील राजुरामध्ये ६ हजार ८५० मते वाढली- राहुल गांधी

Gold Ring Scheme : सरकारी दवाखान्यात जन्म घेणाऱ्या मुलींना मिळणार सोन्याची अंगठी, खासदार धनंजय महाडिक यांची मोठी घोषणा

'दशवतार' सिनेमा ऑनलाइन लीक! अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली...'आपल्याच माणसांनी असं...'

सुरू होतोय Amazon Great Indian Festival 2025 Sale; स्मार्टफोन, लॅपटॉपसह 'या' २० वस्तूंवर ८०% पर्यंत डिस्काउंट

SCROLL FOR NEXT