Amit Shah, Kairana Team eSakal
देश

केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना कोरोना नियमांचा विसर

उत्तर प्रदेशच्या कैराना शहरात ते विनामास्क प्रचार करताना दिसून आले.

सुधीर काकडे

उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) आगामी काळातील विधानसभा निवडणुकांच्या (Assembly Elections 2022) पार्श्वभूमिवर भाजपने जोरदार तयारी सुरू केल्याचं पाहायला मिळतंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi), केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्यासह भाजपच्या बड्या नेत्यांनी ताकद पनाला लावली आहे. त्यातच अमित शहा यांनी आज उत्तर प्रदेशच्या कैराना शहरात घरोघरी जाऊन लोकांशी संपर्क साधला. यावेळी अमित शहा (Amit Shah) यांच्यासह अनेकांनी कोरोना नियमांचं उल्लंघन केल्याचं पाहायला मिळालं.

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमिवर निवडणूक कठोर नियम लागू केले आहेत. कोणत्याही प्रकारची सभा, पदयात्रा, रॅली, कॉर्नर मिटींग घेण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. मात्र समोर आलेल्या फोटोमध्ये अमित शहा यांच्यासह पक्षाचे कार्यकर्ते विनामास्क दिसून येत आहेत. त्यामुळे आता अमित शहा यांच्याविरोधात कारवाई होणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे.

कोरोना नियमावलीचं पालन करुनच निवडणुका पार पडतील असं आयोगाने सांगितलं आहे. त्यानुसार रोडशो, पदयात्रा, सायकल रॅली काढण्यास मनाई आहे. त्यामुळे उमेदवारांच्या प्रचार रॅलीला मुभा नाही. तसंच कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता प्रतिबंधात्मक नियमांचं पालन करणं देखील आवश्यक आहे. मात्र मास्क न वापरता गर्दीत वावरल्यानं कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT