MLA Suresh Shrivastava File Photo
देश

उत्तर प्रदेश : आमदार सुरेश श्रीवास्तव यांच्यानंतर पत्नीचेही निधन, मुलाची प्रकृती गंभीर

उत्तर प्रदेशात कोरोनाचा हाहाकार उडाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

लखनऊ : उत्तर प्रदेशात कोरोनामुळे हाहाकार उडाला असून राज्यात सर्वाधिक बिकट परिस्थिती राजधानी लखनऊमध्ये निर्माण झाली आहे. रविवारी भाजपा आमदार सुरेश श्रीवास्तव यांच्या पत्नी मालती यांचा कोरोनामुळं मृत्यू झाला. दोन दिवसांपूर्वीच आमदार श्रीवास्तव यांचाही कोरोनामुळं मृत्यू झाला होता. दरम्यान, त्यांची पत्नी आणि मुलालाही संसर्ग झाला होता. त्यांच्या मुलाचीही प्रकृती गंभीर असल्याचं सांगण्यात येत आहे.

लखनऊ पश्चिम मतदारसंघातील आमदार असलेले सुरेश श्रीवास्तव यांना कोरोनाच्या संसर्गानंतर लखनऊच्या संजय गांधी आयुर्विज्ञान संस्थानमध्ये भरती करण्यात आलं होतं. याठिकाणी त्यांना सात दिवस व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. मात्र, त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आणि त्यांचा शुक्रवारी मृत्यू झाला. त्याचदरम्यान त्यांच्या पत्नी मालती यांच्यावर सेंट जोसेफ रुग्णालयात उपचार सुरु होते, याठिकाणी उपचारांदरम्यान रविवारी त्यांचा मृत्यू झाला.

उत्तर प्रदेशात कोरोनाच्या वेगानं वाढत्या संक्रमणामुळं हाहाकार माजला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये औरेयाचे भाजपा आमदार रमेश दिवाकर आणि उत्तर प्रदेश सरकारमधील राज्यमंत्री हनुमान मिश्रा यांचा कोरोनामुळं मृत्यू झाला होता. याशिवाय राज्याचे अनेक आमदार आणि मंत्री देखील कोरोनाने संक्रमित झाले आहेत. इतकेच नव्हे तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना देखील कोरोनाची लागण झाली असून त्यांनी स्वतःला विलगीकरणात ठेवलं आहे.

उत्तर प्रदेशात गेल्या २४ तासांत कोरोनाची ३५,६१४ नवी प्रकरणं समोर आली आहेत. राज्यात आता २,९७,६१६ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तसेच आत्तापर्यंत ११,१६५ लोकांचा या महामारीमुळं मृत्यू झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat : कॅप्टन खरातचा 'गेम' ओव्हर! आयपीएस तेजस्वी सातपुते यांच्याकडे तपासाची सूत्रे; बड्यांचे धाबे दणाणले

IPL 2026 Marathi News: ऑस्ट्रेलियन खेळाडूंचे माघार सत्र! दिल्ली कॅपिटल्स, सनरायझर्स हैदराबाद यांना धक्के; कारण काय तर

Tiger Attack: वाघाच्या हल्ल्यात इसमाचा मृत्यू; मोहफुले वेचताना हल्ला, मृतदेह फरकटत नेऊन पायाचे लचके तोडलं अन्..

Malad East Mumbai Accident : मुंबईत पुन्हा एकदा 'खड्डा' ठरला कर्दनकाळ; बांधकाम व्यावसायिकाच्या एका चुकीमुळं 8 वर्षांच्या दिव्यांशचा करुण अंत, चेंडू काढायला गेला अन्...

Ashok Kharat: अन्यथा असे आणखी अशोक खरात उदयास येतील; उत्तर महाराष्ट्रात अनेकांची आयुष्य उद्ध्वस्त, संपत्ती लुटली, तरी सरकार निष्क्रिय!

SCROLL FOR NEXT