UP Court Murder Cases esakal
देश

UP Court Murder Cases : संपूर्ण देशात खळबळ माजवणारे युपीचे न्यायलायीन खून खटले

यूपीमध्ये झालेल्या या हत्याकांडाने भूतकाळातील न्यायालयाच्या आवारात झालेल्या हत्याकांडांची आठवण करून दिली आहे.

सकाळ डिजिटल टीम

UP Court Murder Cases : बुधवारी, उत्तरप्रदेशची राजधानी लखनऊ येथील कैसरबाग येथील न्यायालयाच्या आवारात भरदिवसा गोळीबार करण्यात आला. हल्लेखोराने संजीव महेश्वरी उर्फ जीवावर 9 एमएम पिस्तुलाने गोळीबार केला. यामध्ये मुख्तार टोळीचा शूटर जीवाचा जागीच मृत्यू झाला. या गोळीबारात 4 जण जखमी झाले आहेत.

या हत्याकांडामुळे संपूर्ण यूपीमध्ये खळबळ माजली आहे. या हत्याकांडाने भूतकाळातील न्यायालयाच्या आवारात झालेल्या हत्याकांडांची आठवण करून दिली आहे.

1. संजीव माहेश्वरी यांच्या हत्येने लखनऊ न्यायालय हादरले

लखनौ कोर्टात बुधवारी भरदिवसा गोळ्या झाडून हत्या करण्यात आलेला संजीव माहेश्वरी हा मुख्तार अन्सारीचा जवळचा मानला जात होता. 10 फेब्रुवारी 1997 रोजी यूपीचे माजी ऊर्जा मंत्री आणि भाजप नेते ब्रह्मदत्त द्विवेदी यांच्या हत्या प्रकरणात त्याचं नाव आलं होतं. या प्रकरणी त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. जीवाची हत्या करणाऱ्या आरोपीचे नाव विजय यादव असे असून तो बिजनौरचा रहिवासी आहे.

2. कुख्यात बदमाश लखन सिंगची हापूर न्यायालयाबाहेर हत्या

16 ऑगस्ट 2022 रोजी, हरियाणाचा कुख्यात हिस्ट्रीशीटर लखनपालला हापूरला आणण्यात आले. हापूरच्या न्यायालयाबाहेर 4 हल्लेखोरांनी 20 राऊंड वेगाने गोळीबार केला. यामध्ये लखनपाल ठार झाला. कोर्टात खून करून मनोज भाटी आणि त्याचे साथीदार पळून गेले. मात्र, नंतर मनोज भाटी पोलिसांशी झालेल्या चकमकीत मारला गेला.

3. मुझफ्फरनगर कोर्टात विकी हत्येचा खटला

कुख्यात बदमाश विक्की त्यागीची 16 फेब्रुवारी 2015 रोजी मुझफ्फरनगर, यूपी येथील न्यायालयात हत्या करण्यात आली होती. उत्तराखंडमधील कोटद्वार कारागृहातून त्याला मुझफ्फरनगर न्यायालयात हजर करण्यात आले.

दुपारी 2.30 वाजता वकिलाच्या वेशात आलेल्या हल्लेखोराने कोर्टात घुसून विकी त्यागीवर पिस्तुलाने 12 गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात विकी ठार झाला. विकी त्यागी हा स्वतः पश्चिम यूपीचा शार्प शूटर होता. त्याच्यावर दरोडा, खून आणि खंडणीचे 25 गुन्हे दाखल होते.

4. यूपी बार कौन्सिलच्या अध्यक्षाची हत्या

12 जून 2019 रोजी, यूपी बार कौन्सिलच्या अध्यक्षपदी निवडून आलेले दरवेश यादव यांच्यावर आग्रा न्यायालयात त्यांच्या एका माजी सहकारी वकिलाने लायसन्स पिस्तूलने 5 गोळ्या झाडल्या. ते त्यांच्या चेंबरमध्ये बसले असताना त्यांच्यावर हा हल्ला झाला. दरवेश यादवची हत्या केल्यानंतर हल्लेखोर वकिलाने स्वतःवरही गोळी झाडली.

5. मेरठ न्यायालयात टोळीयुद्ध झाले

16 ऑक्टोबर 2006 रोजी मेरठच्या कोर्टात टोळीयुद्ध झाले. चित्रपट शैलीतील टोळीयुद्धाने संपूर्ण राज्य हादरले. उत्तर प्रदेशातील कुख्यात रवींद्र सिंग भुरा आणि त्यांच्या पुतण्याला न्यायालयात गोळ्या घालून ठार करण्यात आले. याशिवाय राजेंद्र उर्फ चुरमुट याचाही पोलिसांच्या गोळीने मृत्यू झाला. यामध्ये यूपीचा एक पोलीस हवालदारही शहीद झाला. या टोळीयुद्धात कोर्टात आलेले 7 जण जखमी झाले.

6. मुरादाबाद कोर्टात ब्लॉक प्रमुखाची हत्या

24 फेब्रुवारी 2015 रोजी पश्चिम उत्तर प्रदेशातील मुरादाबादमधील डिल्लारीच्या ब्लॉक प्रमुखाची कोर्टात पोलिस कोठडीत हत्या करण्यात आली होती. योगेंद्र उर्फ भुरा याच्यावर कोर्टात 2 जणांनी गोळ्या झाडल्या आणि त्यानंतर तो फरार झाला. योगेंद्र उर्फ भुरा हे पश्चिम उत्तर प्रदेशातील गुन्हेगारी जगतातही मोठे नाव होते. योगेंद्रवर त्याच्या एका मारेकऱ्याच्या भावाची हत्या केल्याचा आरोप होता. म्हणजेच बदला घेण्यासाठी ही हत्या करण्यात आली. (Crime News)

7. बिजनौर न्यायालयात गोळ्या झाडल्या

19 डिसेंबर 2019 रोजी बिजनौरच्या कोर्टात यूपीचा हिस्ट्रीशीटर शाहनवाजची 11 गोळ्यांनी हत्या करण्यात आली. एका खटल्यात दिल्लीच्या तिहार तुरुंगातून त्याला बिजनौर न्यायालयात हजर करण्यात आले होते. या सुनावणीसाठी शहनवाजचा भाऊही त्याच्यासोबत आला होता, मात्र घटनेदरम्यान तो पळून गेला. न्यायालयात झालेल्या या हल्ल्याने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली. (Uttar Pradesh)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Black Magic Ritual: महाराष्ट्र हादरला! सोळा वर्षीय मुलीवर अघोरीकृत्य, वर्षभरापासून सुरू होता प्रकार! शेवपेटीत झोपवायचा अन्...

Latest Maharashtra News Updates : पंचगंगेच्या पाणीपातळीत अर्ध्या फुटाने घट; कोल्हापुरात अद्यापही ४८ बंधारे पाण्याखाली

Vidarbha Rain: विठ्ठल पावला... विदर्भात पावसाची संततधार; यवतमाळात नदी नाल्यांना पूर, नागपूर, भंडारा, गोंदिया, सर्वत्र पावसाचा संचा

Hinjawadi IT Park : हिंजवडीमधील समस्यांचा मुख्यमंत्री घेणार आढावा; आमदार महेश लांडगे यांचा पुढाकार

Basmat Crime: विदर्भातील तरुणीवर प्रेमाच्या नावाखाली अत्याचार; वसमतमधील आरोपी अटकेत

SCROLL FOR NEXT