Amit Shaha
Amit Shaha esakal
देश

उत्तर प्रदेशची निवडणूक भारताचे भवितव्य ठरवेल : अमित शहा

निनाद कुलकर्णी

नवी दिल्ली : आगामी उत्तर प्रदेशातील (UP Assembly Election 2022) विधानसभेची निवडणूक भारताचे भवितव्य ठरवेल असे, मत केंद्रीय मंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी व्यक्त केले आहे. यावेळी त्यांनी सपाचे प्रमुख अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांच्यावर देखील जोरदार हल्ला चढवला. शहा म्हणाले की, अखिलेश यांना निवडून आणणे म्हणजे उत्तर प्रदेशात "गुंडा राज" परत येणे होय असे शहा यावेळी म्हणले. यूपी आज प्रगती करत असून, हे यूपीच भारताचे भवितव्य ठरवेल असा विश्वास शहा यांनी यावेळी व्यक्त केला. ते मथुरेत बोलत होते. (UP Election Will Decide Indias Destiny Says Amit Shah)

एक वेळ होती जेव्हा गुंड आणि गुन्हेगारांनी (Terrorism) अशी दहशत पसरवली होती की राज्य पोलिसही (UP Police) त्यांना घाबरायचे. महिला आणि तरुणींना बाहेर पडण्याची भीती वाटत होती. पण आता ते बदलले आहे. गुंड आणि गुन्हेगार आता पोलिसांबद्दल इतके घाबरले आहेत की, ते स्वेच्छेने आत्मसमर्पण करत आहेत. आम्ही उत्तर प्रदेशला वंशवाद आणि जातीवादा पासून दूर नेले आहे आणि विकासावर लक्ष केंद्रित केले आहे. (Development In UP )

अयोध्या (Aayodhya) आणि वाराणसीनंतर (Varanasi) मथुरा हे राज्यातील तीन प्रमुख धार्मिक स्थळांपैकी एक आहे, त्याचाच एक भाग म्हणूनही शहा यांच्या या दौऱ्याकडे पाहिले जात आहे. दरम्यान, 2014, 2017 किंवा 2019 मध्ये, येथे फक्त कमळ विजयी झाले आहे, असे सांगत मी तुमच्यापैकी प्रत्येकाचे वैयक्तिक आभार मानू इच्छितो असे शहा यांनी मथुरा वासियांना यावेळी सांगितले. तुम्ही उत्तर प्रदेश मजबूत करण्यात मदत केली असल्याचेही यावेळी शहा यांनी सांगितले. (UP Assembly Election News In Marathi)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gautam Gambhir: 'KKR जिंकल्यावर गंभीरचे कौतुक अन् हरल्यावर श्रेयसची चूक?' दिग्गज क्रिकेटरच्या पोस्टने उडवली खळबळ

Radhika Kheda: "मला मद्य पिण्याची ऑफर दिली अन् कार्यकर्ते..."; राधिका खेरांचा काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर गंभीर आरोप

Artificial Intelligence in Business: चक्क ९४ टक्के भारतीय प्रोफेशनल्स करतात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, काय आहे कारण ?

The Family Man 3: प्रेक्षकांसाठी खुशखबर! 'द फॅमिली मॅन 3'बद्दल मनोज बाजपेयींनी दिली मोठी अपडेट

Lok Sabha 2024: मतदान केंद्रांना नायलॉनच्या जाळ्यांचे कवच, 101 वाघ असलेल्या जंगलात असं पार पडणार वोटींग

SCROLL FOR NEXT