viral video sakal
देश

Video: रुसलेल्या बायकोला मनवण्यासाठी नवरा चढला...

असाच एका शोले स्टाईल नवऱ्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय.

सकाळ डिजिटल टीम

सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही मजेशीर असतात तर काही थक्क करणारे असतात. काही व्हिडिओ आश्चर्यचकीत करणारे असतात. नवरा बायकोच्या भांडणाचे तर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. असाच एका शोले स्टाईल नवऱ्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय.

हा शोले स्टाईल नवरा बायकोला मनवण्यासाठी चक्क टॉवरवर चढला. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय.

हा शोले स्टाईल नवरा पत्नीला सासरी घेऊन जाण्यासाठी न्यायला आलाय. मात्र पत्नीने नकार दिला तेव्हा तो चक्क इलेक्ट्रिक टॉवरवर चढला. पोलिसांनी त्याला खाली येण्यास सांगितले पण तो ऐकायला तयार नव्हता. त्यानंतर पोलिसांना यावर नक्की तोडगा काढू असेही सांगितले पण त्याने काहीही ऐकले नाही. अखेर त्याच्या बायकोने घरी परत येण्यास होकार दिला तेव्हा कुठे तो खाली उतरला.

ही घटना उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खेरी जिल्ह्यातील असून देशराज असे या व्यक्तीचे नाव आहे.

सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेचा विषय ठरलाय. नेटकरी या व्हिडिओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत असून हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जातोय. नेटकरी मजेशीर प्रतिक्रिया देत आहे. काही नेटकऱ्यांनी तर देशराजला शोले चा धर्मेंद्र म्हटलयं तर कोणी देशराजचं कौतुक केलयं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT