cold wave esakal
देश

पुढील २४ तासांत 'या' राज्यांत गारठा वाढणार; हवामान विभागाची माहिती

महाराष्ट्रात पुढील 24 तासांत थंडीची तीव्रता वाढणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

महाराष्ट्रात पुढील 24 तासांत थंडीची तीव्रता वाढणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून देशासह राज्याच्या वातावरणात अचानक बदल झाला आहे. पुढील दोन दिवसांत पुन्हा थंडीची लाट येण्याची शक्यता भारतीय हवामान खात्यानं (IMD) वर्तवली आहे. मागील काही दिवसांपासून देशातील अनेक राज्यांमध्ये थंडीचा तडाखा वाढला आहे. दरम्यान, आता पुन्हा एकदा येत्या २४ तासांत थंडी वाढण्याची शक्यता असल्याची माहिती हवामान खात्यानं दिली आहे. (Cold Wave) देशातील किमान तापमानात जास्त बदल नसला तरी नंतर हळूहळू हा बदल होऊन थंडी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील २४ तासांत मध्य भारतात किमान तापमानात जास्त बदल होणार नाही मात्र नंतर हळूहळू हा बदल वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील 24 तासांत थंडीची तीव्रता वाढणार आहे. याचा परिणाम देशातील मध्य प्रदेश, (MP) विदर्भ व‌ छत्तीसगड या काही ठराविक भागात जाणवणार असून कालांतराने ही तीव्रता कमी होईल. त्यामुळे पुढील २४ तासांत महाराष्ट्रातील (Maharashtra) विदर्भ, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशातील काही भागांत थंडीच्या लाटेची शक्यता असून तिची तीव्रता हळूहळू कमी होणार असल्याचे स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, राज्यात कोकण, (Konkan) मध्य आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्हे गारठले आहेत. तर उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातही थंडीचा कहर सुरूच असून, नागपूरसह सर्वच जिल्ह्यांतील पाऱ्यात पुन्हा मोठी घट झाली आहे. थंडीच्या तीव्र लाटेमुळे नागपूरच्या तापमानात दीड अंशाची घसरण होऊन पारा विदर्भात नीचांकीवर आला. हवामान विभागाने विदर्भात आणखी चोवीस तासांचा ‘येलो अलर्ट’ (Yellow alert) दिला असला तरी, त्यानंतरही काही दिवस थंडीचा कडाका कायम राहणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Delhi Pollution Master Plan : दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना 'WFH' अनिवार्य, पार्किंग शुल्कातही दुप्पट वाढ; प्रदूषण नियंत्रणासाठी नवे धोरण लागू

Pune Highway Upgrade: घोडेगाव–मंचर–बेल्हे महामार्ग विकासाला ४७० कोटींचा मुबलक निधी; भीमाशंकर प्रवास २० किमीने कमी, भाविकांना मोठा दिलासा

Parbhani News: घरी परतताना काळाचा घाला! जिंतूरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकरी महिलेचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

SCROLL FOR NEXT