देश

तिसरा झटका! योगींच्या मंत्रिमंडळातील तिसरा मंत्री 'सायकल'वर स्वार

सकाळ डिजिटल टीम

लखनऊ : यूपीमध्ये निवडणुकीपूर्वी भाजपला अनेक धक्के बसत असून, पहिल्या टप्प्यातील निवडणुकीची अधिसूचना जारी होण्यापूर्वीच उत्तर प्रदेश सरकारचे कामगार आणि रोजगार मंत्री स्वामी प्रसाद मौर्य यांनी भाजपला रामराम केला आहे. भाजप सरकार दलित, मागास, तरुण, शेतकरी, बेरोजगार आणि वंचितांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. मौर्य यांच्या राजीनाम्यानंतर दुसऱ्याच दिवशी वनमंत्री दारा सिंह चौहान यांनीही राजीनामा दिला आहे. तर, गुरुवारी योगी सरकारमधील आणखी एक मंत्री धरमसिंह सैनी यांनी देखील राजीनामा दिला आहे. बहुतांश आमदार आणि मंत्री समाजवादी पार्टीमध्ये सामील होत आहेत.

त्यांचा पक्षात प्रवेश केल्यानंतर समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी म्हटलंय की, 'सामाजिक न्याया'चे आणखी एक योद्धे डॉ. धरमसिंह सैनीजी यांच्या आगमनाने आपल्या 'सकारात्मक आणि पुरोगामी राजकारणाला' अधिक उत्साह आणि बळ मिळाले आहे. सपामध्ये त्यांचे हार्दिक स्वागत आहे आणि शुभेच्छा आहेत! 2022 साली सर्वसमावेशकतेचा आणि सुसंवादाचा विजय होणार याची खात्री आहे! त्याखाली त्यांनी 'मेला होबे!' असा हॅशटॅगही जोडला आहे.

उत्तर प्रदेशसहित पाच राज्यांमध्ये (Uttar Pradesh) निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे. यूपीमध्ये निवडणुकीच्या तोंडावरच पक्षाला घरघर लागली आहे. आतापर्यंत योगी सरकारमधील तीन मंत्र्यांनी राजीनामा दिला असून आणखी काही आमदार पक्षाला रामराम ठोकण्याची शक्यता आहे. दरम्यान, योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांना पहिला झटका देणाऱ्या स्वामी प्रसाद मौर्य (Swami Prasad Maurya) यांच्या अटकेसाठी अटक वॉरंट जारी करण्यात आलं आहे. एका जुन्या खटल्यामध्ये त्यांना हे वारंट बजावण्यात आलंय.

दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी म्हटलंय की, आता एकही दिवस असा नाहीये जात ज्या दिवशी भाजपचा एखादा नेता पक्ष सोडत नाहीये. उदाहरणासाठी यूपीचं घ्या. त्याठिकाणी 13 आमदार दुसऱ्या पक्षास सामील होण्यासाठी भाजपची साथ सोडत आहेत. मला असं समजलंय की, भाजपचे आणखी चार आमदार आजच पक्ष सोडत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : अर्चना पाटील यांच्या समर्थनार्थ पंतप्रधान मोदी यांच्या धाराशिवमधील सभेला सुरुवात

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल राहण्यासाठी बेस्ट आहे चिकनकारी कुर्ती, अशा पद्धतीने करा स्टाईल

Credit Card: ग्राहकांना मोठा फटका! 1 मे पासून क्रेडिट कार्डद्वारे बिल भरणे होणार महाग; किती वाढणार खिशावरचा भार?

T20 World Cup 2024 : IPL दरम्यान वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया होणार अमेरिकेला रवाना! तारीख आली समोर

Prajwal Revanna : 'मुलगा खोलीत तर बाप दुकानात बोलवायचा...', माजी पंतप्रधानांच्या नातवाचा सेक्स स्कँडल, कोण आहे प्रज्वल रेवण्णा?

SCROLL FOR NEXT