Uttarakhand esakal
देश

Uttarakhand: मुख्यमंत्री सौर स्वयंरोजगार योजनेंतर्गत पाच प्रकल्पांना मंजुरी; उत्तराखंडमध्ये हरित ऊर्जेला मिळणार प्रोत्साहन

हरित ऊर्जेवर प्रभाव टाकण्यासाठी मुख्यमंत्री सौर स्वरोजगार योजना सुरू करण्यात आली आहे

Pooja Karande-Kadam

Uttarakhand: हरित ऊर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी उत्तराखंडमध्ये मुख्यमंत्री सौर स्वयंरोजगार योजने अंतर्गत काही प्रकल्पांना मंजूरी देण्यात आली आहे. यामध्ये स्वयंरोजगार योजनेंतर्गत ५२६५ किलोवॅट क्षमतेच्या पाच प्रकल्प राबवण्यात येणार आहेत. त्यासाठी यापूर्वी प्रस्तावही मागविण्यात आले होते.

राज्यात हरित ऊर्जेवर प्रभाव टाकण्यासाठी मुख्यमंत्री सौर स्वरोजगार योजना सुरू करण्यात आली आहे. त्याअंतर्गत राज्यात सौरऊर्जेला चालना देण्यासाठी राज्य सरकार सातत्याने प्रयत्नशील आहे. यामध्ये सरकारने अधिसूचित केलेल्या उत्तराखंड राज्य सौर ऊर्जा धोरण २०२३ अंतर्गत दुसऱ्या श्रेणीसाठी अर्ज मागविण्यात आले होते.

त्यानंतर आता मुख्यमंत्री सौर स्वयंरोजगार योजनेंतर्गत पाच सौर ऊर्जा प्रकल्प मंजूर करण्यात आले आहेत. या योजनेच्या माध्यमातून राज्यात हरित ऊर्जेलाही प्रोत्साहन दिले जात आहे. राज्यात सौरऊर्जेसाठी खासगी क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक दिवसांपासून प्रयत्न केले जात असले, तरी अद्याप फारसे यश आलेले नाही.

ऊर्जा सचिव आर. मीनाक्षी सुंदरम यांनीही याबाबत प्रयत्न केले आहेत. त्यासाठी आर. मीनाक्षी सुंदरम यांच्या अध्यक्षतेखाली शासन स्तरावर स्थापन करण्यात आलेल्या राज्यस्तरीय समितीने सौर ऊर्जेशी संबंधित पाच प्रस्तावांना मंजुरी दिली असून त्याची क्षमता ५२६५ किलोवॅट आहे. (Uttarakhand)

विशेष म्हणजे सौरऊर्जेच्या क्षेत्रात २४ कोटींची गुंतवणूक अपेक्षित आहे. याशिवाय हरित ऊर्जेला चालना देण्यासाठी ही योजना लाभदायी ठरणार आहे. एवढेच नव्हे तर उत्तराखंड पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडच्या घरगुती ग्राहकांसाठी रूफटॉप सोलर पॉवर प्लांट आणि सुविधांची ही व्यवस्था करण्यात येत असून, त्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून लोकांना अनुदानही दिले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Delhi Protest : दिल्लीत आज तणावपूर्ण दिवस ! सीजेपीच्या निदर्शनाला पोलीसांचा विरोध, राहुल गांधींचा इंडिया गेट ते सर्वोच्च न्यायालय मोर्चा

Fodder Shortage: सध्याचा चारा पुरणार फेब्रुवारी अखेरपर्यंत;जिल्ह्यात २७ टक्के पावसाची तूट; खरिपाचे उत्पन्न घटणार

Maharashtra Navratri 2026: साडेतीन शक्तिपीठांवर भक्तीचा जागर! तुळजाभवानी, रेणुकामाता, अंबाबाईसह सप्तशृंगीच्या दर्शनासाठी गर्दी

Pune News: पुण्यात बांधकाम परवानगीचे नियम बदलले; लेआउटमधील रस्त्यांबाबत पीएमआरडीएचा मोठा निर्णय, काय आहेत नवे नियम?

Water Rights: मराठवाड्याच्या हक्काचे पाणी कागदावरच; १६८ टीएमसी, २५ टीएमसीसह अन्य निर्णय प्रलंबित असल्याचा समितीचा आरोप

SCROLL FOR NEXT