Uttarakhand  esakal
देश

Dhangadi Bridge : अखेर पूल बांधण्यास केंद्राची परवानगी, मुख्यमंत्र्यांनी मानले पंतप्रधान अन् गडकरींचे आभार

मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मानले आभार

Pooja Karande-Kadam

Uttarakhand : उत्तराखंड राज्यातील रामनगर जिल्ह्यातील धनगढी नाल्यावर पूल बांधण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. या बांधकामासाठी तब्बल ३० कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्याबद्दल उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आभार मानले आहेत.

उत्तराखंड जवळच्या रामनगरजवळ राष्ट्रीय महामार्ग-309 वर धनगढी नाला आहे. पावसाळ्यात या नाल्याला अचानक पूर येतो. त्यामुळे वाहतूक ठप्प होते. तसेच, इतर गावांशी संपर्कही तुटतो. त्यामुळे या नाल्यावर पूल बांधण्याची मागणी नागरिक अनेक वर्षांपासून करत आहेत.

केंद्राने निधी मंजूर केल्याने तिथल्या लोकांची गैरसोय होणार नाही. परिसरातील लोकांची अनेक वर्षांपासूनची मागणी पूर्ण झाली आहे.लोकांची अनेक दिवसांपासून मागणी होती. मुख्यमंत्री धामी यांनी पुलाच्या निर्मितीसाठी पाठपुरावा करत होते.

या पुलाला मंजुरी दिल्याने मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आभार मानले आहेत. (Uttarakhand)

पुलाच्या बांधकामासाठी किती मिळाला निधी

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने पत्र लिहून याबाबत उत्तराखंडच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रधान सचिवांना लेखी कळवले आहे. यासाठी एकूण 29.65 कोटी रुपये खर्च येणार आहे.

पावसाळ्यात धनगढी नाल्याला महापुराचे स्वरूप आले होते. त्यामुळे अनेक वाहने वाहून गेल्याच्या घटना सर्रास घडल्या आहेत. त्यामुळे अनेक गाड्यांचे नुकसान झाले होते. पण हा पूल बांधल्याने नागरिकांचे होणार हाल थांबणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: दिलासादायक बातमी! ओसी मिळवण्याची प्रक्रिया सोपी आणि जलद होणार; नवे निकष लागू करणार, पण कोणते?

Pune Traffic Update: पुण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मंगळवारी वाहतुकीत बदल; मार्गांवरील वाहतुकीत तात्पुरते कसे आहेत बदल?

MI vs RCB: पांड्या ब्रदर्समध्ये वाद? कृणालने आधी हार्दिकला बाऊन्सर मारला अन् आऊट होताच असं काही केलं की...

विजय वर्मासोबत मटका किंगमध्ये महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार 'ही' मराठी अभिनेत्री; व्यक्तिरेखेबद्दल म्हणाली..

Hydrogen Cooking Stove India : गॅस किंवा रॉकेलची गरज नाही, चक्क पाण्यावर चालतो 'हा' स्टोव्ह, मात्र किंमत ऐकून बसेल धक्का!

SCROLL FOR NEXT