three kidney
three kidney sakal
देश

'देनेवाला जब भी देता..' एका व्यक्तीला चक्क तीन किडन्या, आता म्हणतो..

सकाळ डिजिटल टीम

सोशल मीडियावर अनेक अचंबित करणाऱ्या गोष्टी व्हायरल होत असतात. सध्या उत्तर प्रदेशमधील कानपूरचं एक प्रकरण चांगलचं चर्चेत आहे. येथील एका व्यक्तीच्या शरीरात तीन किडन्या आहे. तुम्हाला वाटेल हे कसं शक्य आहे? पण हे खरंय. कानपूरच्या या ५२ वर्षीय व्यक्तीच्या शरीरात दोन नव्हे तर चक्क तीन किडन्या आहेत. (uttarprdesh kanpur person have three kidneys in body)

सहसा लोकांच्या दोन किडन्यांमधून एक किडनी खराब झाली की एका किडनीवर जीवन जगावं लागतं पण या व्यक्तीवर देवाने एक्स्ट्रा कृपा दाखवली आहे. सुशील गुप्ता असे या व्यक्तीचे नाव असून त्यांच्या शरिरात चक्क तीन किडन्या आहेत.

गुप्ता यांनी 2020 मध्ये ब्लैडर सर्जरीच्या आधी अल्ट्रासाउंड केले होते. अलट्रासाउंड रिपोर्टमधून त्यांना तीन किडन्या आहे, असे माहित पडले. त्यांचा विश्वास बसला नाही. त्यानंतर त्यांनी काही दिवसानंतर पुन्हा अल्ट्रासाउंड केले आणि तेव्हा डॉक्टरांनी त्यांना सांगितले की त्यांच्या शरीरात तीन किडन्या आहेत.

सुशील गुप्ता यांना इतक्या वर्षापासून तीन किडन्यांचा कधीच त्रास झाला नाही. ते नॉर्मल जीवन जगत आहे. त्यांच्या मते हि देवाची कृपा आहे. सुशील गुप्ता हे आपल्या डोळ्यांसोबत किडनी पण दान करण्याचा निर्णय घेणार आहे. ते म्हणतात जर कोणाला किडनीची गरज असेल तर ते किडनी दान करायला तयार आहे. जन्माच्या आधी एम्ब्रयोनिक डेवलपमेंट (Embryonic Development) च्या दरम्यान जेव्हा एक किडनी तुटून दोन किडनी बनते तेव्हा बाळ तीन किडन्यासह जन्माला येतो.

तज्ञांच्या मते कोणत्याही व्यक्तीला तीन किडन्या असणे खुप दुर्लभ आहे. तीन किडनी असल्यानंतरही व्यक्ती एक नॉर्मल लाइफ़ जगू शकतो, असे अनेक रिपोर्ट्समधून समोर आले. पण त्यांना जर कोणतीही समस्या निर्माण झाली तर त्यांनी त्वरीत डॉक्टरांशी संपर्क साधावा, असेही तज्ञ सांगतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Updates : पुण्यात पावसाचा उद्रेक! कुठे झाडं कोसळली, कुठे पत्रे उडाले तर अनेक रस्त्यांवर पाणीच पाणी

Pune Porsche Crash : कल्याणीनगर अपघातापूर्वी अन् नंतर नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण घटनाक्रम

Mumbai Lok Saha Election : मुंबईत अनेक ठिकाणी संथगतीने मतदान! कळवा-मुंब्र्यात अनेकजण मतदान न करताच परतले

Lok Sabha Election: कल्याण पश्चिम, भिवंडी मतदारसंघात निवडणूक आयोगाचा सावळा गोंधळ; मतदार यादीतून हजारो नागरिकांची नावं गायब

'शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला होता, ती जर सुपारी होती तर आमचीही..'; आव्हाड, राऊतांच्या टीकेला मनसे आमदाराचं प्रत्युत्तर

SCROLL FOR NEXT