देश

मोठी बातमी - भारत बायोटेक कंपनीला मोठं यश, भारतात कोरोनाची पहिली लस तयार         

सकाळवृत्तसेवा

मुंबई : संपूर्ण जगभरात कोरोना संसर्गावर लस शोधण्याचे प्रयत्न सुरू असून अद्याप कुणालाही यश आलेलं नाही. भारताला कोरोनाविरोधाच्या लढाईत मोठं यश आलं आहे. भारतात कोरानाची पहिली लस तयार झाली आहे. हैद्राबाद मधील भारत बायोटेक कंपनीने ही लस तयार केली आहे. या लसीला केंद्र सरकारकडून मानवी चाचणीसाठी परवानगी मिळाली आहे. चाचणी यशस्वी झाली तर संपूर्ण जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना आजाराला वेसण घालणे शक्य होणार आहे.

कोरोना संसर्गाने भारतात केल्यापासून म्हणजे साधारणता गेल्या चार महिन्यापासून या लसीवर काम सुरू होतं. अखेर महिन्यानंतर लस शोधण्यात यश मिळाले. भारत बायोटेक कंपनीने आयसीएमआर आणि नॅशनल इन्स्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी यांच्यासोबत मिळून ही लस तयार केली आहे. भारत बायोटेक कंपनीने तयार केलेल्या लसीचं नाव कोवॅक्सिन असं आहे. सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (सीडीएससीओ), आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने या लसीच्या पहिल्या आणि दुसर्‍या टप्प्यातील क्लिनिकल चाचण्यांना मान्यता दिली आहे. या लसीची येत्या जुलै महिन्यात मानवी चाचणी केली जाईल. या लसीची मानवी चाचणी यशस्वी ठरली तर त्याचा फायदा संपूर्ण जगाला  होईल.                                                               

कोरोनावरील ही लस तयार करण्याचा अनेक आघाड्यांवर प्रयत्न सुरु होते. लस तयार करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या व्हायरसच्या स्ट्रेनला पुण्यातील एनआयव्ही येथे वेगळं करण्यात आलं होतं. त्यानंतर ते हैदराबादला भारत बायोटेक कंपनीकडे पाठवण्यात आलं. तिथे संशोधन केल्यानंतर भारतातील पहिली कोरोना लस विकसित झाली.

संपूर्ण जगाला वेठीस धरणाऱ्या तसेच जगभरात मृत्यूचे तांडव घालणाऱ्या या आजाराने अक्षरशः थैमान घातले आहे. सात महिन्यानंतर ही जगभरात बाधित रुग्णांचा आकडा वाढत आहे. अश्यात कोरोना आजारा विरोधातील लस तयार करण्यासाठी हजारो वैज्ञानिक आणि संशोधक काम करत आहे. जगातील बहुतेक छोटे - मोठे देश लसीचं काम करत आहेत. जगभरात 100 पेक्षा जास्त वैज्ञानिक संस्था या कामात अहोरात्र मेहमत घेत आहेत. भारतातही अनेक वैज्ञानिक आणि संशोधक प्रयत्न करत आहेत. यादरम्यान, भारत बायोटेकने पहिल्या लसीचं घोषणा केली आहे. या लसीकडे देशासह जगभरातील लोकांच्या आशा आहेत. या लसीसाठी करण्यात येणारी चाचणी यशस्वी ठरली तर संपूर्ण जगाला याचा फायदा होणार आहे.         

या संशोधनामुळे सर्वच थरातून आनंद व्यक्त होत आहे.लस शोधणाऱ्या संशोधकांनी ही समाधान व्यक्त केले आहे.“देशातील पहिली स्वदेशी लस आम्ही तयार केली, या गोष्टीचा आम्हाला अभिमान आहे. ही लस तयार करण्यासाठी आयसीएमआर आणि एनआयव्हीने केलेली मदत उल्लेखनीय आहे”, अशी प्रतिक्रिया भारत बायोटेक कंपनीचे अध्यक्ष डॉ. कृष्णा ईल्ला यांनी दिली. 

vaccine on corona made by bharat biotech big relief is expected to come

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record Internet Speed: इंटरनेट स्पीडचा वर्ल्ड रेकॉर्ड! 10,000 पेक्षा जास्त 4K सिनेमे एका क्षणात झाले डाउनलोड, कुठे घडला हा चमत्कार?

Hinjewadi Electric Supply : हिंजवडीतील वीजपुरवठा ७२ तासांनी पूर्वपदावर; नागरिकांकडून सुटकेचा निःश्वास

Latest Marathi News Updates : बँकेबाहेर विसरलेली सव्वा लाखाची रोकड असलेली पिशवी दांपत्यास केली परत

Valhe News : बँकेबाहेर विसरलेली सव्वा लाखाची रोकड असलेली पिशवी दांपत्यास केली परत

Video: बापरे! प्रार्थना बेहरेच्या पायाला गंभीर दुखापत, व्हिडिओ शेअर करत म्हणाली...'तुमच्या आशिर्वादाची...'

SCROLL FOR NEXT