Charactorystics of Vikram S Rocket : इस्रोने नुकतंच विक्रम एस या पहिल्या प्रायव्हेट रॉकेटचं लाँच करण्यात आलं आहे. ३ पे-लोड असलेला हा खास 'विक्रम एस' रॉकेट इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (इस्रो)ने श्रीहरी कोटाच्या सतीश धवन स्पेस सेंटरमधून याचं लाँच केलं आहे.
कसं बनवलं 'विक्रम एस' रॉकेट
रॉकेटची निर्मिती हैद्राबादच्या स्कायरूट एयरोस्पेस (Skyroot Aerospace) कंपनी ने केली आहे. प्रसिध्द भारतीय वैझानिक व इस्रोचे संस्थापक डॉ. विक्रम साराभाई यांच्या नावावरून या रॉकेटचं नाव ठेवण्यात आलं आहे. या लाँचला मिशन प्रारंभ नाव देण्यात आलं होतं. स्कायरूट एयरोस्पेस कंपनीच्या मिशन प्रारंभच्या पाचव्या मिशनचं उद्घाटन इस्रो चीफ डॉ. एस सोमनाथ यांच्या हस्ते झालं.
काय आहे विक्रमची खासियत?
विक्रम एस एक सब ऑर्बिटल उड्डान घेणार आहे. हे सिंगल स्टेज सब ऑर्बिटल लाँच व्हेइकल आहे. ज्यात तीन कमर्शियल पेलोड्स आहेत.
एक प्रकारची टेस्ट फ्लाइट आहे. यात जर यशस्वी झालो तर भारत प्रायव्हेट स्पेस कंपनींमध्ये रॉकेट लाँचिंगसाठी जगातल्या अग्रेसर देशांच्या यादीत समाविष्ट होईल.
या रॉकेटद्वारा लहानशा उपग्रहाला पृथ्वीच्या ठरवलेल्या कक्षेत स्थापीत केलं जाईल.
स्कायरूट एयरोस्पेसने २५ नोव्हेंबर २०२१ ला नागपूरच्या सोलर इंडस्ट्री लिमिटेड च्या तपासणी व्यवस्थेत पहिल्या थ्रीडी प्रिंटेड क्रायोजेनिक इंजन (First 3D Printed Cryogenic Engine)ची यशस्वी तपासणी केली होती.
यातलं थ्रीडी क्रायोजोनिक इंजिन इतर क्रायोजेनिक इंजिनच्या तुलनेत जास्त विश्वासार्ह आहे. त्यासोबतच हे ३०-४० टक्के स्वस्त आहे.
यात इतर इंधनांऐवजी LNG म्हणजेच लिक्वीड नॅचरल गॅस आणि लिक्वीड ऑक्सिजन (LoX) चा वापर केला आहे. हे स्वस्त आणि प्रदुषण मुक्त आहे.
या क्रायोजेनिक इंजिनचं टेस्टिंग करणाऱ्या टीमच नाव लिक्वीड टीम आहे. यात साधारण १५ तरूण वैज्ञानिक सहभागी होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.