traffic lights esakal
देश

Viral Video : पुढे जायचं नाही! स्मार्ट ट्रॅफिक सिग्नलचा व्हिडिओ व्हायरल

सोशल मीडियावर हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय

सकाळ वृत्तसेवा

सोशल मीडियावर हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय

सोशल मीडियावर (Social Media) एक व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत आहे, ज्यावर तुम्ही हसणं थांबवू शकणार नाही. सोशल मीडियावरील लोकांना हा व्हिडिओ खूप पसंत पडत आहे. त्याचबरोबर वाहतुकीचे नियम पाळण्याचा सल्लाही ते लोकांना देत आहेत. अनेकदा असे दिसून येते की, लोक वाहतुकीच्या नियमांकडे गांभीर्याने पाहत नाहीत. काही लोक सिग्नल तोडण्याचीही तसदी घेत नाहीत. मात्र, ते जीवित आणि मालमत्तेसाठी नुकसानकारक आहे.

विशेषतः वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांसाठीही ते घातक आहे. अनेक प्रसंगी वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागतो. त्यासाठी सर्वच सिग्नलवर वाहतूक पोलिस दक्ष असतात. या क्रमाने सोशल मीडियावर मजेशीर व्हिडिओ शेअर केले जात आहेत. या व्हिडीओमध्ये एका चौकातील सिग्नलचे दिवे वाऱ्यामुळे हलत असल्याचं स्पष्ट दिसत आहे.

वाऱ्यामुळे दिवे हालत आहेत, पण ते अशा प्रकारे हालत आहेत की, नो-नो साइनचा फलक तयार केला जात आहे. हे दृश्य अत्यंत मजेशीर आहे. कुणीतरी हे दृश्य त्याच्या मोबाइलमध्ये रेकॉर्ड केलं आहे. त्याचबरोबर अनेक गाड्या सिग्नलजवळ उभ्या असून गाड्यांमध्ये बसलेले लोक गंमतीने सिग्नलचे दिवे पाहताना दिसताहेत.

हा व्हिडिओ भारतीय सेवेतील अधिकारी दीपांशु काबरा यांनी आपल्या अकाऊंटवरून सोशल मीडिया ट्विटरवर शेअर केला आहे. कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलयं की, "स्मार्ट ट्रॅफिक लाईट, स्वत: सांगतेय - "आता पुढे जाऊ नका" हा व्हिडिओ 10 हजार हून अधिक वेळा पाहिला गेला आहे. त्याचबरोबर अनेक लोकांनी कमेंट करत यावर टीका केली आहे. त्याचबरोबर तरुणांना स्टंटबाजी टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AirPods Pro 3 ची धमाकेदार एंट्री; मोजणार हृदयाचे ठोके अन् करणार लाईव्ह ट्रान्सलेशन, 15 जबरदस्त फीचर्स, किंमत फक्त...

B Sudarshan Reddy reaction : उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीतील पराभवानंतर बी. सुदर्शन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

Pune News : हवेची गुणवत्ता वाढल्याने पुण्याचा देशात १० वा क्रमांक

Hingoli Accident : भरधाव एसटीच्या धडकेत दुचाकीस्वार ठार; बसची विद्युत खांबाला धडक

CP Radhakrishnan देशाचे १५ वे उपराष्ट्रपती, आता सुविधा काय मिळणार? पगाराचा आकडा वाचून व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT