Weather Update Rain North Karnataka esakal
देश

Weather Update : 'या' जिल्ह्यांवर अस्मानी संकट; मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता

३० मे रोजीही मेघगर्जनेसह वादळी वारा व पाऊस (Rain) होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

सकाळ डिजिटल टीम

गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या उन्हाळ्यात वळीव पावसाचे प्रमाण कमी आहे. सोमवारी (ता.२२) बेळगाव शहरासह जिल्‍ह्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला.

बेळगाव : बेळगावसह (Belgaum) उत्तर कर्नाटकातील (North Karnataka) काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह वादळ, विजांच्या गडगडाटासह पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने (Meteorology Department) वर्तविली आहे. शुक्रवारी (ता.२६) सकाळी साडेआठ वाजेपर्यंत वादळ व पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

प्रतितास ३० ते ४० किमी वेगाने वादळी वारे वाहणार असल्याचेही हवामान खात्याने कळविले आहे. बेळगाव, गदग, हावेरी, रायचूर, यादगीर या जिल्‍ह्यांसाठी हा इशारा देण्यात आला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर खबरदारी घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी नितेश पाटील यानी केले आहे.

३० मे रोजीही मेघगर्जनेसह वादळी वारा व पाऊस (Rain) होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पण त्या दिवशी बेळगाव जिल्ह्यात पाऊस होणार नाही. बागलकोट, बिदर, गुलबर्गा, रायचूर, विजापूर व यादगीर जिल्ह्यांमध्ये पाऊस होणार आहे. त्यामुळे बेळगावकरांना केवळ शुक्रवारी खबरदारी घेण्याची गरज आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या उन्हाळ्यात वळीव पावसाचे प्रमाण कमी आहे. सोमवारी (ता.२२) बेळगाव शहरासह जिल्‍ह्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. यामुळे जीवितहानी झालेली नाही.

पण, हेस्कॉमचे मोठे नुकसान झाले आहे. याशिवाय काही खासगी व सार्वजनिक मालमत्तांचे नुकसानही झाले आहे. सोमवारी पावसाचे प्रमाण कमी होते, पण वादळी वारे मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे झाडे, विद्युत खांब उन्मळून पडले. त्यानंतर प्रशासनाकडूनही खबरदारी घेण्यास सुरूवात झाली आहे. हवामान खात्याकडून वादळी वारे व पाऊस पडणार असल्याची माहिती मिळाल्यावर लगेचच नागरीकांना सतर्क केले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विराट कोहलीवर पाच कोटींचा आरोप करणाऱ्या फलाहारी महाराजांनी मागितली माफी, म्हणाले...

Mumbai Protest Faceoff : "काय करायचं ते करा!"; शिवाजी पार्कवर पोलिसांनी अडवताच अमित ठाकरे भडकले, पोलिसांनी घेतलं ताब्यात

३५ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीच्या शरीराचा सौदा, ठाण्यात हायप्रोफाईल देहविक्रीचे रॅकेट उघड; महिलेला रंगेहाथ अटक

Daily Horoscope: आजचे राशिभविष्य : मेषसह या राशींना व्यवसायात यश; काहींना अचानक धनलाभाची शक्यता

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT