Former NSG commander formally joins the BJP ahead of the West Bengal Assembly elections, marking a significant political development before the polls.

 

esakal

देश

Ex-NSG Commander Joins BJP : बंगाल निवडणुकीआधी भाजपला मोठी ताकद; माजी 'NSG' कमांडरसह बड्या व्यक्तींचा प्रवेश

West Bengal BJP News : यावेळी सुवेंदू अधिकारी यांनी निलंबित टीएमसी आमदार आणि जनता उन्नयन पक्षाचे प्रमुख हुमायून कबीर यांच्यावर गंभीर आरोप केले.

Mayur Ratnaparkhe

आगामी काळात पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. परंतु त्याधी मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. आज(मंगळवार)  कोलकाता येथे, विरोधी पक्षनेते शुभेंदू अधिकारी आणि भाजप प्रदेशाध्यक्ष शमिक भट्टाचार्य यांच्या उपस्थितीत, अनेक प्रमुख व्यक्तींनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.

यामध्ये माजी एनएसजी कमांडर आणि अंडरकव्हर एजंट दीपांजन चक्रवर्ती,  माजी सीआरपीएफ डीएसपी बिप्लब बिस्वास आणि माजी सीपीएम कॅबिनेट मंत्री खिती गोस्वामी यांच्या कन्या कस्तुरी गोस्वामी यांचा समावेश आहे.

या पत्रकार परिषदेदरम्यान, सुवेंदू अधिकारी यांनी निलंबित टीएमसी आमदार आणि जनता उन्नयन पक्षाचे प्रमुख हुमायून कबीर यांच्यावर गंभीर आरोप केले. सुवेंदू अधिकारी यांनी दावा केला की मुर्शिदाबादमध्ये बाबरी मशिदीची पायाभरणी करण्यापूर्वी हुमायून कबीर सात दिवस बांगलादेशात होते. तिथे हुमायून कबीर स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खात्यातून पैसे काढत होते आणि ते पैसे बांगलादेशातून त्या खात्यात येत आहेत याची चौकशी झाली पाहिजे.

मागील निवडणूक समीकरणे काय होती?-

बंगाल विधानसभेत एकूण २९४ जागा आहेत. २०२१ च्या निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसने मोठा विजय मिळवला होता. २९२ जागांच्या निवडणुकीत, तृणमूल काँग्रेसने २९४ पैकी २१३ जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवले होते.

 या निवडणुकीत तृणमूल काँग्रेसचा मतांचा वाटा अंदाजे ४८ टक्के होता. तर, भाजप ७७ जागा जिंकून राज्यातील मुख्य विरोधी पक्ष म्हणून उदयास आला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sidharth Malhotra's Father Passes Away : सिद्धार्थ मल्होत्राच्या वडिलांचे निधन!, भावूक होत केली पोस्ट अन् म्हणाला...

Bhigwan Crime : आई अन् भावाच्या डोळ्यांत मिरची पूड टाकून तरुणीचे दोघांकडून अपहरण

Car Accident : भरधाव मोटारीच्या धडकेत बालकाचा मृत्यू; तिघे जण गंभीर जखमी

Pune Traffic: गुरुवारी पुणे शहरातील वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद? कोणते रस्ते सुरु? वाचा सविस्तर

पोलिस भरतीच्या लेखी परीक्षेसाठी एका पदासाठी १० उमेदवार! सोलापूर शहर-ग्रामीण पोलिसांच्या १६९ पदांसाठी ३१६६ जण ‘मैदानी’त पास, वाचा...

SCROLL FOR NEXT