crime news in dinajpur sakal
देश

West Bengal : विद्यार्थिनीला शिवीगाळ, महिला शिक्षिकेला संतप्त जमावाकडून विवस्त्र करत मारहाण

या घटनेची माहिती मिळताच पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी हे प्रकरण शांत केलंय

सकाळ डिजिटल टीम

या घटनेची माहिती मिळताच पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी हे प्रकरण शांत केलंय

पश्चिम बंगाल येथील दक्षिण दिनाजपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. एका महिला शिक्षकाने विद्यार्थीनीला शिक्षा केल्याने संबंधित शिक्षिकेला विवस्त्र करुन मारहाण करण्यात आली आहे. ही घटना परिसरातील हिली पोलिस स्टेशन हद्दीतील त्रिमोहिनी प्रताप चंद्रा या हायस्कूलमध्ये घडली असल्याची माहिती मिळत आहे. या घटनेसंदर्भात पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या हायस्कूलमध्ये गुरुवारी विद्यार्थिनीला एका महिला शिक्षकाने शिवीगाळ केली होती. यानंतर दुसऱ्या दिवशी दुपारी विद्यार्थीनीचे कुटुंबिय अचानक शाळेत दाखल झाले. त्यांनी या प्रकरणाची तक्रार हायस्कुलच्या मुख्याध्यापकांकडे केली. यादरम्यान, काही लोकांनी त्या महिला शिक्षेकेला मारहाण करण्यास सुरु केली. तिला विवस्त्र करुन ही मारहाण करण्यात आल्याचा आरोप होत आहे. ९ वी मध्ये शिकणारी संबंधित विद्यार्थीनी अल्पसंख्याक समुदायाची असल्याचे सांगण्यात येत आहे.

या घटनेची माहिती मिळताच पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. हे प्रकरण शांत करत असताना पोलिसांना स्थानिक नागरिकांमध्ये रोष दिसून आला. दरम्यान, शनिवारी या घटनेचा निषेध करत स्थानिकांनी या परिसरात रास्ता रोको आंदोलन केले. महिला शिक्षिकेला मारहाण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी भाजपाच्या भाजपचे खासदार सुकांत मजुमदार यांनी केली आहे.

या घटनेसंदर्भात भाजप खासदार मजुमदार म्हणाले, मीही एक शिक्षक होतो. अनेक विद्यार्थ्यांनाही मी फटकारले आहे. संबंधित शिक्षिकेने विद्यार्थिनीला शिवीगाळ केल्यावर तिच्या कुटुंबाने दोनशे लोकांनी शाळेवर हल्ला केला. मात्र शाळेच्या मुख्याध्यापकांनी एफआयआर नोंदवला नाही याचे मला आश्चर्य वाटते, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

याप्रकरणी सुरुवातील पोलिसांनी गुन्हा नोंद केला नव्हता मात्र दुसऱ्या दिवशी स्थानिकांनी रस्ता रोको आंदोलन केल्यानंतर पोलिसांनी 35 जणांविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. या घटनेबाबत पीडित शिक्षिकेने सांगितले, विद्यार्थिनीला शिस्त लावण्यासाठी तिचे कान ओढत शिवीगाळ केली होती. पण यापूर्वी अशी घटना कधीही घडली नाही. या घटनेमुळे आम्हाला असुरक्षित वाटत आहे.

या घटनेसंदर्भात बीडीओ आणि अध्यक्षांना फोन करून माहिती दिली आहे. मला सुरक्षिततेची कमतरता जाणवत आहे. जे घडले ते अपेक्षित नव्हते, अशी प्रतिक्रिया हायस्कूलचे मुख्याध्यापक कमल कुमार जैन यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Muncipal : सत्ता मिळाली, पण विकासाचे स्वप्न पूर्ण होणार का? महायुतीसमोर खरी कसोटी सुरू!

Pune News: पुणे महापालिकेतील पदाधिकाऱ्यांच्या दिमतीला आलिशान गाड्या; महापौर, उपमहापौरांसह समिती अध्यक्षांसाठी महापालिकेकडून २८ वाहनांची खरेदी!

Zilla Parishad Election Pune Crime : पुणे येथील अजित पवार गटाच्या उमेदवार पतीवर जिवघेणा हल्ला, पोलिस बंदोबस्त वाढवला

ZP Elections 2026 Voting Live Update : लातूरमध्ये बोहल्यावर चढण्या आधी नवरदेवाने बजावला मतदानाचा हक्क

Mumbai News: राज्यातील सहकारी बँकेतील ‘सत्ताधीशां’ना धक्का; संचालकांचा कार्यकाळ फक्त दहा वर्षेच, बँकांचे राजकारण ढवळून निघणार!

SCROLL FOR NEXT