Rahul Gandhi News sakal
देश

LokSabha Election : राहुल गांधींची खासदारकी गेल्यानंतर वायनाड जागेची काय स्थिती, कधी होणार पोटनिवडणूक?

काँग्रेस नेते राहुल गांधी (Congress leader Rahul Gandhi) यांना खासदार म्हणून अपात्र ठरवण्यात आलंय.

सकाळ डिजिटल टीम

लोकसभा सचिवालयानं काल राहुल गांधी यांच्या अपात्रतेची अधिसूचना दिली आणि आता पोटनिवडणुकांच्या तारखा जाहीर करणं निवडणूक आयोगावर अवलंबून आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी (Congress leader Rahul Gandhi) यांना खासदार म्हणून अपात्र ठरवण्यात आलंय. यानंतर आता रिक्त झालेल्या केरळमधील वायनाड लोकसभा (Kerala Wayanad) जागेसाठी पोटनिवडणूक सप्टेंबरपर्यंत होण्याची शक्यता आहे.

आता सर्वांचं लक्ष निवडणूक आयोगाकडं लागलं आहे. मानहानीच्या एका प्रकरणात दोषी ठरल्यानंतर आणि दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावल्यानंतर गुजरातमधील सुरत न्यायालयानं (Surat Court) राहुल गांधींना गुरुवारी अपात्र ठरवलं. या निकालाविरोधात अपील करण्यासाठी काँग्रेस नेत्याला 30 दिवसांचा जामीन मंजूर करण्यात आला आहे.

लोकप्रतिनिधी कायदा 2015 च्या कलम 151A नुसार, संसद आणि विधानसभांच्या रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक जागा रिक्त झाल्यापासून सहा महिन्यांच्या आत घेण्यात यावी, असं तज्ञांचं मत आहे. याच कायद्यानुसार राहुल गांधींना खासदारकीतून हटवण्याचा मार्ग मोकळा झाला. कायद्याचं कलम 8(3) म्हणतं की, संसद सदस्याला दोन वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठी फौजदारी गुन्ह्यासाठी दोषी ठरवलं असल्यास तो अपात्र ठरतो.

लोकसभा सचिवालयानं काल राहुल गांधी यांच्या अपात्रतेची अधिसूचना दिली आणि आता पोटनिवडणुकांच्या तारखा जाहीर करणं निवडणूक आयोगावर अवलंबून आहे. लोकसभेच्या आता जालंधर, लक्षद्वीप आणि वायनाड या तीन जागा रिक्त आहेत. सप्टेंबरपर्यंत वायनाड जागेसाठी पोटनिवडणूक (Wayanad Lok Sabha By-Election) होण्याची शक्यता आहे. राहुल गांधींनी 2019 मध्ये उत्तर प्रदेशमधील अमेठीची जागा गमावली आणि त्यांच्या दुसऱ्या जागेवरून वायनाडमधून लोकसभेवर ते निवडून गेले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak Case : नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयचा मोठा खुलासा; कोर्टात उघड झाले धक्कादायक तपशील, मनिषा मांढरेचा घटनाक्रम सांगितला

Night Heat Reason : सूर्य मावळला तरी घरात उकडतंय? रात्रीसुद्धा एवढं गरम का वाटतं? वैज्ञानिकांनी सांगितलं आश्चर्यकारक कारण

Shaktipeeth Highway Protest : शक्तीपीठ महामार्गाविरोधात सोलापुरातील शेतकरी संतप्त, पुणे-सोलापूर महामार्ग ठप्प; राजू शेट्टी पोलिसांत शाब्दिक चकमक

“लोकसंख्या कमी करायची जबाबदारी आहे माझ्यावर…” शंशाक केतकर व्हिडिओ शेअर करत म्हणाला... 'हिंदू आहे आणि...'

Latest Marathi News Live Update : दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिकेतील छेडछाड आता गुन्हा ठरणार

SCROLL FOR NEXT