गुजरातमधील अहमदाबादमध्ये एक मोठा विमान अपघात झाला. एअर इंडियाचे विमान विमानतळाजवळ कोसळले. AI171 विमानात २४२ लोक होते. सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला असण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सरदार पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून विमानाने उड्डाण केल्यानंतर तीन मिनिटांत मेघनानी नगर परिसरात हा अपघात झाला. विमान डॉक्टर्स हॉस्टेलमध्ये कोसळले. या विमानातील सर्व लोकांची माहिती समोर आली आहे. यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांच्या नातेवाईक होते. त्यांच्याबाबत माहिती समोर आली आहे.
एअर ट्रॅफिक कंट्रोल (एटीसी) नुसार, एआय-१७१ ने अहमदाबाद विमानतळाच्या धावपट्टी २३ वरून दुपारी १:३९ वाजता उड्डाण केले. धावपट्टी २३ वरून उड्डाण केल्यानंतर काही वेळातच विमानाला अपघात झाला. हे विमान अहमदाबादहून लंडनला जात होते. विमानात एकूण २४२ लोक होते. यामध्ये १२ क्रू मेंबर्सचा समावेश आहे. या सर्वांचा मृत्यू झाला असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यात एअर इंडियाच्या क्रू मेंबरमध्ये महाराष्ट्रातील दोघींचा समावेश आहे. त्या एअर हॉस्टेस म्हणून कार्यरत होत्या. यातील एक सुनील तटकरेंच्या नातेवाईक आहेत.
या अपघातग्रस्त विमानात महाराष्ट्रातील अपर्णा महाडीक आणि मैथिली पाटील या दोघी विमानाच्या क्रू मेंबर्समध्ये होत्या. यातील अपर्णा महाडिक या सुनील तटकरेंच्या नातेवाईक आहेत. त्या मुंबईत राहतात. त्या मुळच्या कोल्हापूरच्या आहेत. तसेच अपर्णा महाडिक या सुनील तटकरे यांच्या थोरल्या बहिणीची सून आहेत, अशी माहिती समोर आली आहे. या घटनेनं त्यांच्या घरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
विमानातील क्रू मेंबर्सची नावे आली आहेत. त्यामध्ये क्लाईव्ह कुंदर-फर्स्ट ऑफिसर, सुमित सबरवाल, अपर्णा महाडिक, श्रद्धा धवन-केबिन एक्झिक्युटिव्ह 1, दीपक पाठक-केबिन एक्झिक्यूटिव्ह 2, इरफान शेख, नंथेम सिंगसेन, मैथिली पाटील असे आठ जण होते. यामध्ये अपर्णा महाडिक या सुनील तटकरेंच्या नात्यातील आहेत. त्या तटकरेंच्या भाच्याच्या पत्नी होत्या.
तर डॉक्टरांच्या वसतिगृहात झालेल्या अपघातात १५ डॉक्टर जखमी झाले आहेत. त्यांना रुग्णालयात नेण्यात आले आहे. स्थानिक नगरसेवकांनी सांगितले की. अपघातस्थळी किमान २० ते २५ लोक बळी पडले असावेत. लोकांनी जीव वाचवण्यासाठी सातव्या मजल्यावरून उडी मारली. ते देखील जखमी आहेत. तर गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हे देखील विमानात होते. ते त्यांच्या मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते.
या विमानात २३० प्रवाशांपैकी १६९ भारतीय नागरिक आहेत. यामध्ये ५३ ब्रिटिश नागरिक, ७ पोर्तुगीज नागरिक आणि १ कॅनेडियन नागरिक आहे. सर्वांना रुग्णालयात नेण्यात आले आहे. विमानाचे नेतृत्व कॅप्टन सुमित सभरवाल यांनी केले होते आणि त्यांच्यासोबत फर्स्ट ऑफिसर क्लाईव्ह कुंदर होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.