Swami Nityanand sakal
देश

Baba Nityanand : आधी बलात्काराचा आरोपी होता, आता बनवला स्वत:चा देश, कोण आहे स्वामी नित्यानंद?

आज आपण त्याच्याविषयीच सविस्तर जाणून घेणार आहोत.

सकाळ डिजिटल टीम

Swami Nityanand : सध्या नित्यानंद स्वामी सध्या चांगलाच चर्चेत आहे कारण स्वामी नित्यानंद याने दक्षिण अमेरिकन देश इक्वेडोर आणि त्रिनिदाद येथे एका बेटाला कैलासा नाव देऊन त्याला स्वत:चा एक नवीन देश घोषित केले आहे.

या आधीही स्वामी नित्यानंद चर्चेत आला होता जेव्हा भारतात त्याच्यावर लैंगिक शोषण आणि बलात्काराचा आरोप होता. नित्यानंद आधी बलात्काराचा आरोपी होता तर आता त्याने स्वत:चा देश बनवलाय. कोण आहे हा स्वामी नित्यानंद ? आज आपण त्याच्याविषयीच सविस्तर जाणून घेणार आहोत. (who is Swami Nityanand had allegations of rape case and now announced the founding of his own self proclaimed island nation Kailasa)

कोण आहे स्वामी नित्यानंद ?

स्वामी नित्यानंद यांचं खर नाव राजशेखरन असून त्याने योग, वेद, तंत्र, शैव याचा अभ्यास केला होता. नित्यानंद याने मेकॅनिकल इंजीनियरिंगमध्ये डिप्लोमा घेतला होता. मात्र या पदव्या खोट्या असल्याचं बोललं जातं. त्याने रामकृष्ण मठमधून आपले शिक्षण पुर्ण केले, असंही म्हणतात.

स्वामी नित्यानंदवर आहे बलात्काराचा आरोप

२०१० मध्ये स्वामी नित्यानंद याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये तो एका अभिनेत्रीसह आक्षेपार्ह अवस्थेत होता. मात्र हा व्हिडीओ खोटा असल्याचा दावा त्याने केला होता. याशिवाय २०१२ मध्ये नित्यानंदवर बलात्काराचाही आरोप करण्यात आला होता. त्यानंतर नित्यानंद भारतातून पळून गेला.

नित्यानंदने आता स्वत:चा वेगळा देश बनवला

स्वामी नित्यानंदने दक्षिण अमेरिकन देश इक्वेडोर आणि त्रिनिदाद येथे एका बेटाला कैलासा नाव देऊन त्याला स्वत:चा एक नवीन देश घोषित केले आहे. याशिवाय नित्यानंद यांने संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीला त्याच्या देशातून शिष्टमंडळ पाठवले आहे. यासंबंधी नित्यानंद सोशल मीडियावरुन प्रचार करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नातेवाईक नाहीत, आधार नाही; शेवटच्या प्रवासाची चिंता मिटवण्यासाठी वृद्धाने केलं स्वतःचं श्राद्ध

“मी स्क्रिप्ट वाचत नाही, तर लेखक किंवा दिग्दर्शकाकडून त्यांचं व्हिजन ऐकतो” सिनेमा निवडण्यावर सलमानचा खुलासा

Best Mileage Bikes : कमी पेट्रोलमध्ये जास्त चालतात 'या' 5 दमदार बाईक्स; सर्वाधिक मायलेज अन् किंमत लाखाच्या आतच

वल्लरीचा खोटेपणा उघड होणार? तू हि रे माझा मितवा मधील ट्विस्टने प्रेक्षक चकित

Latest Marathi News Live Update : पुण्यात पोलिसांवर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरांचा शोध तीव्र

SCROLL FOR NEXT