Green clothes beside under construction building
Green clothes beside under construction building Sakal
देश

बांधकाम सुरू असलेल्या इमारतींना हिरव्या कापडाने का झाकतात? जाणून घ्या कारण

सकाळ डिजिटल टीम

समाजामध्ये वावरत असताना अनेक गोष्टी आपल्या दृष्टीस पडत असतात. त्यापैकी काही गोष्टी आपल्याला सतत कुठे ना कुठे दिसत असतात, पण त्यापाठीमागचं कारण काय, हे आपल्याला माहित नसतं. किंबहुना आपल्याला त्यामागचं कारण जाणून घ्यावं, हा विचारही अनेकदा डोक्यात येत नाही. आपल्या सतत नजरेस पडणारी अशीच एक गोष्ट म्हणजे बांधकाम (Construction) सुरु असलेल्या इमारतींना (Bulding) झाकण्यासाठी वापरलं जाणारे हिरवे कापड. बांधकाम चालू असणाऱ्या इमारतींना हिरवे कापड का लावलं जातं हे माहिती आहे का?

आपल्या आजूबाजूला अनेक इमारतींचं बांधकाम (Under Construction Building) चालू असतं. या इमारतींच्या बाजूला हिरव्या रंगाचं मोठे कापड लावलं असते. या कापडाचा रंग हिरवा असण्यामागं काही कारणं आहेत. ती कारणं आपण जाणून घेणार आहोत. (Why are buildings under construction covered with green cloth?)

1. बांधकामाधीन इमारतीला हिरव्या रंगाने झाकण्यामागचं प्रमुख कारण म्हणजे उद्देश इमारतीच्या आजूबाजूला राहणाऱ्या लोकांचे धुळीपासून संरक्षण करणे हा आहे. बांधकाम चालू असताना सिमेंट, वाळू, माती तसेच वीटां इ.च्या धुळीचा आजूबाजूला राहणाऱ्या लोकांना त्रास होऊ शकतो. अनेकदा या कारणानं वादसुद्धा होत असतात. त्यामुळे इमारतीभोवती हिरव्या रंगाचं कापड लावलं जाते.

2. याशिवाय हिरवा रंग लांबून दिसत असल्याने आणि रात्रीच्या प्रकाशातही तो परावर्तित होतो. त्यामुळे संभाव्य अपघात टळू शकतात. त्यामुळे कारणास्तव बांधकाम सुरू असलेल्या इमारती हिरव्या कापडाने झाकल्या जातात.

3. इमारतीभोवती कापड लावण्याचा अजून एक फायदा असा की, अनेक इमारती रस्त्याच्या कडेला असतात. वरून एखादी गोष्ट पडून खालून जाणाऱ्या लोकांना त्रास अथवा दुखापत होऊ नये, यासाठी इमारतीभोवती कापड गुंडाळतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ujjwal Nikam: उज्ज्वल निकम यांना भाजपकडून मुंबई उत्तर-मध्यमधून उमेदवारी जाहीर; पुनम महाजन यांचा पत्ता कट

Pune News : पुण्याचे माजी महापौर मोहनसिंग राजपाल यांचे दीर्घ आजाराने निधन

Lok Sabha Election 2024 : भिवंडीत ‘तुतारी’ला सूर गवसेना; मित्रपक्षाच्या ‘हाता’ने वाढवली डोकेदुखी

Shashikant Shinde: मार्केट FSI घोटाळा प्रकरणी शशिकांत शिंदेंवर गुन्हा दाखल; निवडणुकीच्या तोंडावर कारवाईची शक्यता

Latest Marathi News Live Update: पुण्याचे माजी महापौर मोहनसिंग राजपाल यांचे दीर्घ आजाराने निधन

SCROLL FOR NEXT