Forest Conservation Day 2022
Forest Conservation Day 2022 esakal
देश

Forest Conservation Day 2022 : वनसंवर्धन दिन का साजरा केला जातो ?

सकाळ डिजिटल टीम

आज 23 जूलै या दिवशी "वनसंवर्धन दिन" (Forest Conservation Day ) हा साजरा केला जातो. हा दिवस निसर्गातील प्रत्येक गोष्टी जसे झाडे, डोंगर, नद्या, वने, प्राणी, पक्षी यांचे संवर्धन व्हावे आणि समाजात नैसगिक साधनसंपत्तीविषयी जागृती निर्माण व्हावी म्हणून साजरा केला जातो.

आताच्या चालु युगाला विज्ञान आणि तंत्रज्ञाना चे प्रगतशील युग म्हटले जाते. आधुनिक पद्धतीने मानवी बुद्धी व तंत्रांच्या आधारावर विकास आणि प्रगतीचा आलेख उंचावण्यासाठी जगात चढाओढ करत आहे. हे करत असताना मानवाच्या वाढत्या गरजा, अन्नधान्य, कारखाने ,उत्पादने यांची वाढती गरज आणि सोबतच लोकसंख्यानुसार वाढती मागणी या सगळ्या गोष्टींचा प्रचंड ताण नैसर्गिक साधनसंपत्तीवर पडत आहे.

नैसर्गिक वनसंपत्तीला नष्ट करून त्या ठिकाणी मानव आपली वस्ती बसवत आहे , ही वस्ती बसवताना लोक ही गोष्ट विसरतं की विकास गरजेचा अत्यावश्यक आहे तशीच ही वृक्षसंपदा टिकणे त्यापेक्षाही महत्त्वाची आहे.

वाढती लोकसंख्या आणि लोकसंख्या वाढली की त्या लोकांच्या हाताला काम निर्माण करण्यासाठी नवीन निवासी वस्त्या, नवीन कारखानदारी यासाठी अधिक जागेची पूर्तता करण्यासाठी तेथील वनसंपदा माणूस नष्ट करत आहे.

या आधुनिक युगातला माणूस सध्या फक्त आपले सुख ,संपदा ,वैभव, स्वार्थ पाहत आहे.

आधुनिकीकरणाच्या स्मार्ट सिटीच्या नावाखाली निसर्गातील अनेक नैसर्गिक साधनसंपत्तीवर घाला घालून, माणूस आपली हौस पुर्ण करतोय. पण हे सगळं करतांना आपल्याला मुळे निसर्गाच्या संतुलित जीवनचक्राला आपण कुठेतरी ब्रेक लावत आहोत हेच लोकांच्या मुळात लक्षात येत नाही आहे.

"वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे" असे आमच्या संतांनी फार काळापुर्वीच सांगून ठेवले आहे. आपल्या शेतीप्रधान संस्कृतीत पूर्वजांनी वड, पिंपळ, तुळस ,आंबा, लिंब अशा असंख्य प्रकारच्या झाडांना महत्व दिले .

या देशी झाडांचे वृक्षारोपण करुन ,त्यांचे जर का योग्य रित्या संवर्धन केले तर या झाडांमुळे योग्य प्रमाणात पाऊस पडू शकतो त्यामुळे मुबलक पाणी मिळते, सावली मिळते,बाष्प टिकून राहते, ऑक्सिजन मिळतो ,आणि सगळ्यात महत्त्वाच म्हणजे भूजल पातळी वाढते त्यामुळे आपोआप तापमानात घट होते. म्हणून प्रत्येकांने वृक्षरोपण आणि वनसंवर्धन करणे काळाची गरज झाली आहे.

का लावावे झाड ....

कोरोना काळामध्ये तुम्ही आम्ही सगळ्यांनीच अनुभवले की ऑक्सिजन चे महत्व किती आहे ?

त्यामुळे तुम्हाला जर भविष्यात शुध्द ऑक्सिजन जर हवा असेल तर आपणा सर्वांना प्रत्येकी एक एक झाड लावणं गरजेचं आहे. झाडांशिवाय निसर्ग नाही आणि निसर्गाशिवाय सजिव प्राणी जीवन नाही , जन्मापासून ते मृत्यूपर्यंत माणसाला लागणारा श्वास हा आपल्या पृथ्वीतलावर वनस्पती पासून मिळतो . सर्व प्राणीमात्रांना जीवन आवश्यक प्राणवायू हे झाड देत असते.आपणास अपयकारक असणारा शेवटू कार्बन डाय-ऑक्साइड हा विशाल वायू स्वतः शोषून घेऊन सर्व प्राणीमात्रांवर ही वृक्ष संपत्ती दया करत आहे. परंतु आमच्या प्राण्यांचे रक्षण करणाऱ्या वनसंपदेचा आम्ही सतत विनाश करत असतो. आणि या विनाशाचे कारण हे प्राथमिक गरजे पोटी नसून, अधिकाधिक लालसे पायी माणूस जगलांचा नाश करत आहे .

भारतीय वन सर्वेक्षण संस्थे’च्या नोंदीनुसार, 2009 ते 2011 या कालावधीत देशात एकंदर 367 चौरस किमी जंगलांचा नाश झाला आहे. भारतातील नैसर्गिक जंगले दरवर्षी 1.5 ते 2.7 टक्के या वेगाने घटत चालली आहेत. अशा प्रकारे एका बाजूला आपण प्रदूषण वाढवत आहोत, तर दुसर्‍या बाजूला प्रदूषण रोखणारी वने नष्ट करत आहोत. याचे गंभीर परिणामही आता दिसू लागले आहेत. सन 2000 पासून जगभरात प्रदूषणामुळे होणार्‍या मृत्यूमध्ये 300 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यापैकी 65 टक्के मृत्यू आशियात होत आहेत. ‘जागतिक आरोग्य संघटने’नुसार जगभरात दरवर्षी 3.2 दशलक्ष मृत्यू प्रदूषणाशी निगडित आजारांनी होत आहेत. शिवाय स्वाईन फ्ल्यूसारखे नवनवीन आजार जगभरात पसरत आहेत.

वनसंवर्धन व वृक्षारोपण दिनासाठी घोषवाक्य व चारोळ्या

1) वृक्ष संवर्धन दिनाचा दिवस खास वृक्ष रक्षणाच्या घेऊन ध्यास तुम्हा साऱ्यांच्या सहकार्याची आस पृथ्वीला देव मोकळा श्वास..

2) पाहायची असेल जिवसंपदा तर वाचवा वनसंपदा ..!

3) झाडे लावा सृष्टी वाचवा पर्यावरणाचा साधा समतोल लाभेल आरोग्य संपन्नता जीवन आहे अनमोल..

4) भविष्य उद्याचे नव्या पिढीचे संकटात टाकू नका वनांचे करारक्षण उज्वल भविष्याचे हेच धोरण..!

5) जंगल करा घनदाट सळसळेल रक्त मनगटात वृक्षतोड करू नका जीवन धोक्यात टाकू नका..!

अन्न, वस्त्र, निवारा यांसारख्या आपल्या मूलभूत गरजा असोत किंवा चंगळवादी संस्कृतीतील चैनीच्या वस्तू असोत. आपली प्रत्येक गरज पृथ्वीवरील नैसर्गिक साधनसंपत्तीद्वारेच भागविली जाते. त्यामुळे पृथ्वीविषयी कृतज्ञतेची भावना बाळगणे, आपली पृथ्वी स्वच्छ, सुंदर व हरित ठेवणे, ही प्रत्येकाचीच जबाबदारी आहे. म्हणूनच या

वनसंवर्धन दिनाच्या निमित्ताने पृथ्वी वाचविण्याच्या कार्यात आपण हातभार लावण्याचा संकल्प करूया व त्या दिशेने कृतीशील होऊया!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup: भारताच्या प्लेइंग -11 मध्ये पंत की सॅमसन? गावसकर म्हणाले, 'यष्टीरक्षक म्हणून तुलना केली तर...'

Exit Polls: अमित शाहांचं 'मिशन १२०' काय आहे? पक्षाला बळकटी देण्यासाठी भाजपच्या चाणक्याची रणनिती; एक्झिट पोलमधून मिळाले संकेत

Porsche Crash Case: अपघातानंतर ब्लड सॅम्पल बदलण्याचा सल्ला कोणी दिला? पुणे पोर्शे प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या आईचा खुलासा

T20 World Cup: न्युयॉर्कमध्ये टीम इंडियाच्या सुरक्षेबाबत हयगय नाही! विराटभोवतीही दिसला सुरक्षारक्षकांचा घेरा, Video Viral

Kolhapur Crime News: मुंबई बॉम्बस्फोट हल्ल्यातील आरोपीचा कारागृहात हत्या, कैद्यांच्या दोन गटात मारहाणीवेळी घडली घटना

SCROLL FOR NEXT