Taj Mahal Agra esakal
देश

Taj Mahal : ताजमहाल की तेजो महालय? नाव बदलण्याच्या प्रस्तावावर आग्रा महापालिकेत चर्चा

हिंदुत्ववादी संघटनांकडून ताजमहालचं नाव बदलून तेजो महालय करण्याची चर्चा वेळोवेळी होत आहे.

सकाळ डिजिटल टीम

हिंदुत्ववादी संघटनांकडून ताजमहालचं नाव बदलून तेजो महालय करण्याची चर्चा वेळोवेळी होत आहे.

आग्रा : प्रेमाची अमर निशाणी म्हटला जाणारा 'ताजमहाल' (Taj Mahal) सतत चर्चेत असतो. ताजमहालचं नाव बदलण्याचा विषय असो, ताजमहालमधील बंद खोलीचं रहस्य असो किंवा ताजमहालच्या आत भगवा परिधान करण्यावर बंदी असो. मात्र, आता ताजमहालशी संबंधित आणखी एक नवं प्रकरण जोडलं गेलंय.

भाजपचे (BJP) ताजगंज प्रभागातील नगरसेवक शोभाराम राठोड आज (बुधवार) महापालिकेच्या (Agra Municipal Corporation) बैठकीत ताजमहालचं नाव बदलून तेजो महालय करण्याच्या प्रस्तावावर चर्चा करणार आहेत. नाव बदलण्याचा प्रस्ताव यापूर्वीच सभागृहात मांडण्यात आला आहे. ताजमहाल आपल्या नावामुळं सतत चर्चेत असतं. हिंदुत्ववादी संघटनांकडून ताजमहालचं नाव बदलून तेजो महालय करण्याची चर्चा वेळोवेळी होत आहे.

याच दरम्यान आता भारतीय जनता पक्षाचे ताजगंज प्रभागातील नगरसेवक शोभाराम राठोड यांनीही ताजमहालचं नाव बदलण्यासाठी आवाज उठवला आहे. ताजमहालचं नाव बदलण्याबाबत त्यांच्याकडं अशी अनेक तथ्ये आहेत, ज्याच्या आधारावर त्यांनी सभागृहासमोर नाव बदलण्याचा प्रस्ताव ठेवल्याचं नगरसेवक राठोड यांचं म्हणणं आहे. आज बैठक होईल तेव्हा सर्व पुरावेही सभागृहात सादर करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

महानगरपालिकेत ताजमहालचं नाव बदलण्याचा प्रस्ताव मांडणार : राठोड

आज दुपारी तीन वाजता आग्रा महानगरपालिकेत सदनाला सुरुवात होणार असून, त्यात शहरातील सर्व नगरसेवक सहभागी होणार आहेत. यावेळी नगरसेवक शोभाराम राठोड ताजमहालचं नाव बदलण्याचा प्रस्ताव मांडणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I : गौतम गंभीर चूक सुधारणार, Vaibhav Sooryavanshi ला संधी देणार! इंग्लंडविरुद्ध तगडी प्लेइंग इलेव्हन...

Lalitpur Silk Saree: बनारसी-कांजीवरमच्या गर्दीत हरवलेला बुंदेलखंडचा खजिना! ललितपूरची झरी सिल्क साडी का आहे खास?

Latest Marathi News Live Update : आजपासून वर्धा जिल्ह्यातील 1,454 शाळांमध्ये नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात

Kolhapur BJP Corporator : कोल्हापुरात राजकीय भूकंप? भाजपच्या रिंकू देसाईंचे नगरसेवकपद धोक्यात आल्याच्या वृत्ताने खळबळ; नेमकं काय घडलं?

Railway: मध्य रेल्वेकडून दिलासा! विठुरायाच्या दर्शनासाठी ५४ विशेष गाड्या; तिकीट बुकिंग कधीपासून सुरू होणार? तारीख समोर, पाहा वेळापत्रक

SCROLL FOR NEXT