women tahsildar death by burn full story
women tahsildar death by burn full story 
देश

महिला तहसिलदाराला कार्यालयातच पेटविले! वाचा बातमीमागील बातमी

सायली क्षीरसागर

तेलंगणाच्या रंगरेड्डी जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वी एक धक्कादायक घटना घडली. महिला तहसिलदार आपल्याच कार्यालायत जळलेल्या अवस्थेत आढळली. त्यांना जाळण्यात आलंय आणि जळलेल्या विजया रेड्डी (वय 30) तहसिलदार आहेत, हेच कळायला कार्यालयातील लोकांना वेळ लागला. त्यावेळी त्यांच्या केबिनमध्ये नक्की काय घटना घडली, कशामुळे त्यांना इतक्या अमानुषपणे का जाळण्यात आले? याबद्दल सविस्तर माहिती यायला वेळ लागला...

अशी घडली ही दुर्दैवी घटना...
सोमवारी (ता. 4) दुपारी दीडच्या सुमारास एक व्यक्ती विजया यांच्या केबिनमध्ये आली. के. सुरेश असे या व्यक्तीचे नाव होते. त्याने अचानक केबिनमध्ये येऊन विजया यांच्यासह स्वतःच्या अंगावरही पेट्रोल टाकले, मात्र पेटवताना फक्त विजया यांना पेटविले व तो केबिनबाहेर पळत सुटला. आगीची दाहकता बघून सुरेश कार्यालयातून बाहेर पळून गेला. विजया कशाबशा केबिनमधून मदतीसाठी बाहेर पडल्या. पण बाहेर आल्यावरही कार्यालयातील लोकांना त्या विजया आहेत हे ओळखू आले नाही. बाहेर थांबलेल्या कर्मचाऱ्यांनी आग नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले. ब्लँकेट टाकले, पण शंभर टक्के भाजल्यामुळे त्यांनी जागीच जीव सोडला.

धक्कादायक ! जमिनीच्या वादातून महिला तहसीलदाराला कार्यालयातच पेटविले

त्यांना वाचवायला गेलेले दोन कर्मचारीही गंभीर प्रमाणात भाजले. त्यांना उपयारांसाठी जवळच्या रूग्णालयात नेण्यात आले. या गडबडीत सुरेश पसार झाला होतो. मात्र, पोलिसांनी लगेचच त्याच्या मुसक्या आवळल्या. सुरेशने असे का केले, असे करण्यामागे त्याच्यासोबत आणखी कोणाचा हात होता, याचा शोध पोलिस घेत आहेत.   

विजया रेड्डी कोण होत्या?
विजया रेड्डी या पेशाने शिक्षिका होत्या. 2009 मध्ये त्यांनी गट-2 मधून सरकारी नोकरीला सुरवात केली. गेली 3 वर्ष त्या तहसिलदार म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्यामागे पती, मुलगा व मुलगी आहेत. विजया मूळच्या नालगोंडा जिल्ह्यामधील मुनीक्कोडू मंडलम कलवालपल्ली या गावच्या आहेत. 

दोन कारचा अपघात एक ठार दोन जखमी

मारेकरी के. सुरेश कोण आहे?
सुरेश हा दारूच्या आहारी गेलेला रंगरेल्लामधील गोरेल्ली या गावातील स्थानिक आहे. या घटनेमुळे हे गाव हादरून गेले असून, गावात दहशत पसरली आहे. सुरेश हा शेतकरी असल्याचेही कळते. बाचेरान या गावात त्याची सात एकर जमीन असून, ती त्याच्या भावाबरोबर वादात आहे. या संदर्भात न्यायालयात सुनावणीही सुरू आहे. त्यातून ही घटना घडल्याचा संशय राचेकोंडाचे पोलिस आयुक्त महेश भागवत यांनी व्यक्त केला. या घटनेत सुरेशही भाजला असून, त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याबाबत त्याच्या वडिलांशी संवाद साधला असता, ते म्हणाले की, तो गेले काही दिवस खूप दारू पिऊन आमच्याशीही वाद घालायचा. त्याने तहसीलदार कार्यालयात जाऊन असे कृत्य केले याबाबत आम्हाला काहीच माहिती नव्हती. 

राज्यात 1995, 2014मध्ये कसे होते खाते वाटप? वाचा सविस्तर...

गावात शोककळा
विजया या महिला तहसिलदाराला जाळल्यामुळे गावात प्रचंड संतापाची लाट पसरली आहे. गावकऱ्यांनीही सुरेशला माफी मिळू नये अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. या सर्व घटनेचा निषेध म्हणून तेलंगणा महसूल कर्मचारी संघटनेने कामावर बहिष्कार टाकला आहे. तेथील तहसिलदारांबाबत सरकार नकारात्मकता पसरवत आहे, भ्रष्टाचाराचा आरोप करत आहे, असे तेथील तहसिलदारांचे म्हणणे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhavesh Gupta:'पेटीएम'च्या अध्यक्षांचा कंपनीला रामराम, तडकाफडकी घेतला करिअर ब्रेकचा निर्णय

Ganesh Naik: आम्हाला प्रेमाने दिलेला आदेश आवडतो, तंबी देणारा जन्मलेला नाही

IPL 2024 LSG vs KKR : ४८ तासांच्या आत कोलकता पुन्हा मैदानात! लखनौ सुपर जायंटस् विरुद्ध आज सामना

Poonch Attack: 30 महिने... सहावा हल्ला अन् 21 जवानांचे बलिदान; भारतीय लष्कर सतत ठरत आहे दहशतवाद्यांचे टार्गेट

Latest Marathi News Live Update : सुनेत्रा पवार यांच्यासाठी अजित पवार यांची सांगता सभा

SCROLL FOR NEXT