Womens Success Story
Womens Success Story esakal
देश

Womens Success Story : युनिसेफची नोकरी सोडून तिने सुरू केली शूज लॉन्ड्री; आज आहे लाखोंचा टर्नओव्हर

सकाळ डिजिटल टीम

Womens Success Story : असं म्हणतात की, प्रत्येक यशस्वी पुरूषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो. कारण, पुरूषांना एखाद्या कामात मदत करणे, त्याला पाठींबा देणे एक मैत्रीण, आई, पत्नी, बहिण खूप चांगल्या पद्धतीने करू शकते.

मग विचार करा, तीच स्त्री जर स्वत:च्याच मागे उभी राहिली तर तीला अशक्य असे काहीच नाही. याचीच प्रचिती बिहारमध्ये राहणाऱ्या शाझियाला पाहून येते. कारण, तिने जे काम केले आहे ते केवळ स्वत:वर विश्वास ठेवल्यानेच शक्य झाले आहे. काय आहे तिची यशोगाथा पाहूयात.

समजा तूम्ही जगविख्यात अशा एका मोठ्या समुहात काम करत आहात. त्यासाठी तूम्हाला बक्कळ पैसाही मिळत आहे. पण, अचानक तूम्हाला ते काम सोडून लोकांचे शूज साफ करण्याची हुक्की येते. तर, अशावेळी घरचे सदस्य आणि मित्रमंडळी तूम्हाला असा निर्णय घेऊ देतील का?, नाही ना. पण, बिहारच्या भागलपूरच्या ४० वर्षीय शाझिया कैसरने हा पराक्रम ८ वर्षआधीच केला आहे. आणि या कामात ती यशस्वीही झाली आहे.

शाझिया कैसरने ८ वर्षाआधी लोकांचे शूज धुण्याचा व्यवसाय सुरू करण्याची कप्लना मांडली. अशीही कुठली कंपनी असते का, असा विचार करत अतानाच तिने ती गोष्ट सत्यात उतरवली आणि त्याचे नाव रिव्हायव्हल सर्व्हिस शू लाँड्री ठेवले. आज तिची ही कंपनी लाखो रूपयांची उलाढाल करत आहे. जसे कपडे लाँड्रीमध्ये धुतले जातात. त्याचप्रमाणे शाझियाच्या शू लॉन्ड्रीमध्ये शूजची दुरुस्ती, साफसफाई आणि पॉलिशिंग केली जाते.

या बद्दल शाझियाने सांगितले की, जेव्हा तिने ही कल्पना तिच्या कुटुंबासमोर ठेवली. तेव्हा सर्वजण तिच्या विरोधात होते. साहजिकच माझे कुटुंब सुशिक्षित असल्याने त्यांना हे काम छोटे वाटले. तू एक घरंदाज मुलगी असून तू असे काम कशी करणार असा प्रश्न मला तेव्हा विचारला गेला. पण मी माझ्या निर्णयावर ठाम होते. घरच्यांचा विरोध असतानाही मी हा व्यवसाय सुरू केला. यासाठी मी पाटणा येथे ‘रिव्हायव्हल शू-लाँड्री’ दुकान सुरू केले.

शाझियाने फिजिओथेरपीमध्ये पदवी घेतली असून हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंटमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. शाझियाने जागतिक आरोग्य संघटनेमध्ये (युनिसेफ) काम केले आहे. तीला ही कल्पना कशी सुचली असे विचारले असता शाझिया सांगते, एका इंग्रजी मासिकात मी शू लाँड्रीवरील लेख वाचला आणि ती कल्पना आवडली. म्हणून मी बिहारमध्ये शू लॉन्ड्री सुरू करण्याचा निर्णय घेतला.

मी नोकरी करत होते तेव्हाही सतत स्वत:चे काही स्टार्टअप करण्याचा विचार करत असायचे. त्यामूळे या आगळ्या वेगळ्या लाँड्रीबद्दल जेव्हा मला सुचले तेव्हा मी भूतान, पुणे, मुंबई, चेन्नई येथे जाऊन शू लॉन्ड्री बद्दल विचारणा केली. तेव्हा अशी सेवा मिळते हे लोकांना ठाऊकही नव्हते. मला या गोष्टीचे कुतूहल वाटले, आणि मी हाच व्यवसाय करण्याचे निश्चित केले, असेही शाझिया यांनी सांगितले.

पुढे त्या म्हणाल्या की, यानंतर 2014 मध्ये मी पाटण्यात पहिले स्टोअर उघडले. या निर्णयात माझे पती सोबत होते. शूज दुरुस्त करणे, साफ करणे आणि पुन्हा पॉलिश करण्याचे काम मी सध्या करते. चपलांबरोबरच चामड्याच्या इतर वस्तूंचीही दुरुस्ती व स्वच्छता माझ्या दुकानात होते.

रिव्हायव्हल सर्व्हिस या नावाने प्रसिद्ध असलेल्या शाझियाच्या दुकानाला पहिल्यांदा नुकसान भोगावे लागले. कारण त्यांनी एक लाख रुपयांची बचत त्यात गुंतवली होती. शाझियाने हार मानली नाही आणि तिने हा व्यवसाय सुरूच ठेवला. त्यांना कर्मचारी शोधण्यातही अडचणी येत होत्या. 50 लोकांपैकी फक्त 3 लोक त्याच्यासोबत काम करण्यास तयार झाले.

आता शाझियाचा हा अनोखा व्यवसाय भरभराटीला आला आहे. त्या व्यवसायाचे इतर महिलांना प्रशिक्षण देतात. आणि त्यांना कमाईचे हे अनोखे कौशल्य शिकवते. 2016 मध्ये त्यांची बिहारमधील बेस्ट स्टार्टअपसाठीही निवड झाली होती. तिने निवडलेली ही वाट खरंच वेगळी आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC 2024 Team India Squad : हार्दिकला कॅप्टन्सीवरून का हटवलं...? आगरकर गडबडला अन् रोहितनं सावरलं

PM Modi Speech : लव्ह जिहाद, लँड जिहाद, आता वोट जिहाद...; PM मोदींची काँग्रेसवर घणाघाती टीका

Brij Bhushan Singh: भाजपनं ब्रिजभूषण सिंहचं तिकीट कापलं! पण मुलाला दिली उमेदवारी; रायबरेलीचाही उमेदवार जाहीर

Prajwal Revanna: "रेवन्ना प्रकरणी प्रधानमंत्र्यांनी 'त्या' पीडित महिलांची माफी मागावी"; राहुल गांधींची मागणी

Naach Ga Ghuma: बॉक्स ऑफिसवर 'नाच गं घुमा'चा धुमाकूळ; ओपनिंग-डेला केली इतकी कमाई

SCROLL FOR NEXT