Work resumes on building of Grand Ram Temple in Ayodhya govt allows construction to start 
देश

लॉकडाउननंतर राम मंदिर उभारणीला वेग; लवकरच भव्य राममंदिर

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : कोरोनाव्हायरसच्‍या प्रतिबंधासाठी देशभर लॉकडाउन जाहीर केल्याने अयोध्येतील राम मंदिराचे काम थांबले होते. मात्र लॉकडाउनच्या तिसऱ्या टप्‍प्यात काही नियम शिथिल केल्याने मंदिर उभारणीच्या दृष्टिने तयारी सुरू झाली आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा  

लोखंडी बॅरिकेड दूर
मंदिर परिसरात स्वच्छतेच्या कामाबरोबरच जमिनीच्या सपाटीकरणाचे काम सुरु झाले आहे. ज्या ठिकाणी रामलल्लाची मूर्तीची स्थापना केलेली आहे, तेथे लोखंडी बॅरिकेड लावलेले आहेत. ते पार केल्यानंतरच भाविकांना दर्शन घेता येते. आता हे अडथळेही काढण्यास सुरुवात झाली आहे. राम मंदिराच्या उभारणीस प्रारंभ करण्यापूर्वी राम मंदिर फाउंडेशनच्या स्थापनेची सर्व औपचारिकता पूर्ण करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. यामुळे लॉकडाउन संपल्यानंतर राम मंदिराचे काम वेगाने सुरु करता येणार आहे.

भीषण : ट्रकमधून लपून घरी जाणाऱ्या ५ मजुरांचा अपघातात मृत्यू

भूमिपूजन झाले नाही
कोरोनाचे संकट येण्यापूर्वी रामजन्मभूमीवर विराजमान रामलल्लाच्या मूर्तीची परिसरातील नियोजित स्थानी प्रतिष्ठापना केल्यानंतर मंदिर उभारणीच्या कामास प्रारंभ करण्याचे निश्‍चित केले होते. यानुसार चैत्रातील नवरात्रातील पहिल्या दिवशी रामलल्लाची नव्या इमारतीत स्थापना करणे आणि वैशाख नवरात्रातील सप्तमीला म्हणजे ३० एप्रिलला भूमिपूजन करून मंदिराचे काम सुरु होणार होते. पण कोरोनामुळे भूमिपूजन झालेच नाही.

काँग्रेसला मोठा धक्का; एजेएलच्या संपत्तीवर अखेर ईडीची टाच

कोरोनाचा प्रादुर्भाव अद्याप असल्याने साफसफाईची कामे धीम्या गतीने सुरु आहेत. लोखंडाच्या पाइपचे अडथळे, लोखंडाच्या जाळ्या, अस्थायी सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या छावण्या हटवून जमीन सपाटीकरणाला सुरुवात झाली असून कोरोनाचे संकट टळल्यावर कामाला वेग येईल आणि लवकरच राम जन्मभूमीवर श्रीरामाचे भव्य मंदिर साकार होईल. - कमलनाथ, महंत नृत्यगोपाल दास यांचे उत्तराधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Voter Fraud: बापरे! एकाच घरात ४ हजार २७१ मतदार; अधिकाऱ्यांनी केले हात वर, म्हणाले...

Latest Maharashtra News Updates : मुंबईकरांचे म्हाडाच्या लॉटरीतील घराचे स्वप्न लांबणीवर!

Gold Investment : 'पितृपक्षात सोने खरेदी करू नये' हा गैरसमज मोडीत; सराफ व्यावसायिकांचे निरीक्षण

US tariff on India update: अमेरिका लवकरच मोठा निर्णय घेणार! भारतावरील अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ हटवणार?

Neeraj Chopra कडून घोर निराशा! जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक राखण्यात अपयशी, टॉप-६ मध्येही स्थान नाही

SCROLL FOR NEXT