Yogi-Adityanath 
देश

योगी सरकारचा मोठा निर्णय; इतर राज्यात असलेल्या यूपीच्या कामगारांना...!

वृत्तसंस्था

लखनऊ : उत्तर प्रदेशचे रहिवासी असलेले जे कामगार इतर राज्यांत अडकले आहेत त्यांना स्वगृही आणण्याचा विडा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उचलला आहे. या निर्णयामुळे उत्तर प्रदेशच्या कामगारांच्या चेहऱ्यावर थोडं हसू पसरलं आहे. 

लॉकडाऊनमुळे इतर राज्यात अडकलेल्या उत्तर प्रदेशच्या कामगारांना त्यांच्या घरी पोहोचवण्याचा निर्णय योगी सरकारने घेतला आहे. मात्र, त्यासाठी एक अट घालण्यात आली आहे.

ज्या कामगारांनी तेथील राज्यात १४ दिवस क्वॉरंटाइनचा कालावधी पूर्ण केला आहे, त्याच कामगारांना उत्तर प्रदेशमध्ये नेण्यात येणार आहे. याचे नियोजन करण्यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी टीम-११ नावाची एक टीम तयार केली असून त्यांना तसे आदेशही दिले आहेत.

योगी म्हणाले की, दुसऱ्या राज्यात अडकलेल्या यूपीच्या ज्या कामगारांनी क्वॉरंटाइनचा कालावधी पूर्ण केला आहे, त्यांनाच आम्ही घेऊन येणार आहोत. उत्तर प्रदेश राज्यात प्रवेश करताना त्यांची स्क्रीनिंग करण्यात येईल. त्यानंतर त्यांना आणखी १४ दिवसांसाठी एका ठिकाणी क्वॉरंटाइन करण्यात येईल. हरयाणा राज्यात असलेल्या यूपीच्या कामगारांना सुरवातीला आणण्यात येणार आहे. हरयाणातील क्वॉरंटाइन सेंटरमध्ये सुमारे ११ हजार कामगारांना ठेवण्यात आले आहे. 

कामगारांसाठी बनविण्यात येणारे क्वॉरंटाइन सेंटर हे त्यांच्या गावाच्या आसपास उभारण्यात येणार आहेत. या सेंटरमध्ये भरती केल्यानंतर १४ दिवसांचा क्वॉरंटाइन कालावधी पूर्ण करणाऱ्या कामगारांना एक हजार रुपये आणि काही दिवस पुरेल एवढे धान्य देण्यात येणार असल्याचेही योगी यांनी स्पष्ट केले. 

टीम-११ सोबत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कम्युनिटी किचनची संख्या वाढविण्यात यावी, असे निर्देश दिले. तसेच प्रशासनाने परवानगी दिल्याशिवाय कोणत्याही संस्था किंवा व्यक्तीला अन्नधान्याचा पुरवठा करू नये, असेही योगी यांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Farmer Loan Waiver : कर्जमुक्ती योजनेत 65 हजार शेतकरी पात्र; 35 हजार जणांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण, पहिल्या टप्प्यातील यादी प्रसिद्ध

Mumbai News: १० वर्षांच्या मुलाच्या पोटातून काढले एक किलो चुंबक, डॉक्टरांनी वाचवला जीव; गंभीर आजाराने ग्रस्त

Latest Marathi News Live Update : विद्यार्थ्यांनी माफी न मागता माफ कसं करता? संजय राऊत

पंतप्रधान १०० टक्के योग्यच, पण दुसऱ्यांनाही आया असतात; १२ वर्षे तुमच्या लोकांनी केलं त्याची माफी कोण मागणार, राज ठाकरेंचा सवाल

Nashik Municipal Corporation : 'लोकांच्या असंतोषाची परीक्षा पाहू नका, इतिहास आपल्या समोर आहे'; मंत्री छगन भुजबळ यांनी कोणावर साधला निशाणा?

SCROLL FOR NEXT