kannada and urdu teachers merger education sanjay javir solapur esakal
एज्युकेशन जॉब्स

Teacher Recruitment : आनंदाची बातमी! प्राथमिक 1046 तर माध्यमिक शाळांत 'इतक्या' शिक्षकांची होणार भरती

सध्या खानापूर आणि बैलहोंगल तालुक्यात सर्वाधिक जागा रिक्त आहेत.

सकाळ डिजिटल टीम

शिक्षण खात्याने येणाऱ्या काळात बदली प्रक्रिया आणि नव्याने शिक्षक भरतीची प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला तरी सरकारी शाळांत मोठ्या प्रमाणात जागा रिक्त राहणार आहेत.

बेळगाव : विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी बेळगाव (Belgaum) शैक्षणिक जिल्ह्यातील प्राथमिक शाळांत (Primary School) २०२३-२४ च्या शैक्षणिक वर्षांत १०४६, तर माध्यमिक शाळांत २११ अतिथी शिक्षकांची भरती करण्यात येणार आहे.

काही दिवसांपासून सरकारी शाळांमधील सहावी ते आठवीच्या वर्गासाठी शिक्षकांची भरती (Teacher Recruitment) करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. पात्र उमेदवारांच्या मूळ कागदपत्रांची तपासणी पूर्ण केली आहे. पुढील दोन महिन्यांत भरती प्रक्रिया पूर्ण होणार आहे, तरीही राज्यात मोठ्या प्रमाणात शिक्षकांच्या जागा रिक्त असल्याने बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील विविध विभागांत अतिथी शिक्षकांच्या जागा अधिक प्रमाणात भरती करणे आवश्यक आहे.

सध्या खानापूर आणि बैलहोंगल तालुक्यात सर्वाधिक जागा रिक्त आहेत. पहिली ते दहावीच्या शाळा सुरू झाल्यानंतर शिक्षण खात्याने पहिल्या टप्प्यात बेळगाव शैक्षणिक जिल्ह्याला प्राथमिक शाळांसाठी १०४६, तर सरकारी माध्यमिक शाळांसाठी २११ जागा मंजूर केल्या आहेत, मात्र नव्याने शिक्षक भरती करण्यापूर्वी शिक्षण खात्यातर्फे बदली प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्यामुळे शिक्षकांची बदली झाल्याने पुन्हा काही शाळांत जागा रिक्त होणार आहेत.

त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात अतिथी शिक्षकांची भरती वाढवणे गरजेचे आहे. तसेच अतिथी शिक्षकांची भरती करतेवेळी स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देण्याची सूचना करावी. त्यामुळे विविध भागांतील डीएड व बीएडधारकांना काही महिने का होईना रोजगार उपलब्ध होईल.

गतवर्षीच्या अतिथिंना संधी देण्याची मागणी

शिक्षण खात्याने येणाऱ्या काळात बदली प्रक्रिया आणि नव्याने शिक्षक भरतीची प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला तरी सरकारी शाळांत मोठ्या प्रमाणात जागा रिक्त राहणार आहेत. त्यामुळे अधिक प्रमाणात अतिथी शिक्षकांच्या जागा भरती कराव्या लागणार आहेत. त्यामुळे गेल्या वर्षी अतिथी शिक्षक म्हणून काम केलेल्या शिक्षकांना संधी द्यावी, अशी मागणी होऊ लागली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK T20 WC: जसप्रीत बुमराहला नडला, त्या सैम आयुबचा करेक्ट कार्यक्रम केला! पाकिस्तानने १२ चेंडूंत गमावले ३ फलंदाज

Nagpur Mumbai Duronto Express : नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेसच्या वेळेत बदल; काही गाड्यांचे स्थानकही बदलणार, कधीपासून लागू होणार वेळापत्रक?

IND vs PAK T20 WC: इशान किशनची फटकेबाजी, भारताने उभे केले सर्वात मोठे लक्ष्य; पाकड्यांनी ६ स्पिनर्स वापरले, तरीही...

Mulund: २ कोटींची भरपाई, सरकारी नोकरी अन्...; मुलुंड दुर्घटनेतील मृत्यू पावलेल्या रामधनींच्या कुटुंबियांच्या मागण्या काय?

Mumbai High Court : मुलीचा ताबा वडिलांकडे देण्यास उच्च न्यायालयाचा नकार, मुलीच्या हिताला प्राधान्य; वडिलांची याचिका फेटाळली

SCROLL FOR NEXT