IIT  google
एज्युकेशन जॉब्स

IIT Course : आता JEE परीक्षा न देताही घेता येणार 'आयआयटी'मध्ये प्रवेश; असा आहे अभ्यासक्रम

कोणत्याही शाखेत शिकणारे १२वीचे विद्यार्थी अर्ज करू शकतात. बारावीला विज्ञान शाखेत प्रवेश घेतलाच पाहिजे असे नाही.

नमिता धुरी

मुंबई : बारावीनंतर आयआयटीमध्ये शिक्षण घेण्याचे बहुतेक विद्यार्थ्यांचे स्वप्न असते. यासाठी विद्यार्थ्यांना अखिल भारतीय प्रवेश परीक्षा (JEE) द्यावी लागते. पण तुम्हाला माहिती आहे का की JEE न देता आयआयटीमध्ये प्रवेश घेता येतो.

होय, आता आयआयटी मद्रासने बॅचलर इन सायन्स कोर्ससह आयआयटीमध्ये अभ्यास करणे सोपे केले आहे. (how to get admission for IIT course without JEE online course in IIT madras BS course in IIT )

आयटी मद्रासमधून डेटा सायन्स आणि अॅप्लिकेशनमध्ये बीएसचा अभ्यास करू इच्छिणारा कोणताही विद्यार्थी www.iitm.ac.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज भरू शकतो. हा कोर्स पूर्णपणे ऑनलाइन असेल. हेही वाचा - अदानी..हिंडेनबर्ग आणि भविष्य....

प्रवेश कसा मिळेल ?

विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमाला दोन प्रकारे प्रवेश मिळू शकतो. जर एखाद्या विद्यार्थ्याने जेईई परीक्षा उत्तीर्ण केली असेल तर तो या अभ्यासक्रमात थेट प्रवेश घेऊ शकतो इतर विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी एक परीक्षा द्यावी लागेल.

क्षमता

कोणत्याही शाखेत शिकणारे १२वीचे विद्यार्थी अर्ज करू शकतात. बारावीला विज्ञान शाखेत प्रवेश घेतलाच पाहिजे असे नाही. अर्ज करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना दहावीमध्ये गणित आणि इंग्रजी विषय असणे आवश्यक आहे.

अभ्यासक्रमाची रचना कशी असेल ?

हा अभ्यासक्रम ४ टप्प्यांत विभागलेला असेल.

फी संरचना

जर तुम्हाला फाउंडेशन कोर्सचा अभ्यास करायचा असेल तर तुम्हाला ३२ हजार रुपये फी भरावी लागेल. दुसरीकडे, जर तुम्हाला फाउंडेशन कोर्ससह डिप्लोमा हवा असेल तर तुम्हाला ९४,५०० रुपये द्यावे लागतील.

फाउंडेशन कोर्ससह दोन वर्षांचा डिप्लोमा करायचा असेल तर त्यांना १ लाख ५७ हजार रुपये शुल्क भरावे लागेल.

विज्ञान शाखेसाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या कोणत्याही विद्यार्थ्याला २ लाख २१ हजार ते २ लाख २७ हजार फी भरावी लागणार आहे. तर बीएस पदवीसाठी ३ लाख १५ हजार ते ३ लाख ५१ हजारांपर्यंत शुल्क भरावे लागणार आहे.

अर्ज शुल्क

सर्वसाधारण प्रवर्गातील आणि ओबीसी प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी अर्ज भरायचा आहे, त्यांना अर्ज शुल्क म्हणून ३ हजार नोंदणी शुल्क भरावे लागणार आहे. तर SC, ST प्रवर्गातील विद्यार्थ्यांना अर्ज फी म्हणून १५०० रुपये भरावे लागतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Subhanshu Shukla meet PM Modi : शुभांशू शुक्ला यांनी पंतप्रधान मोदींना दिली ‘ती’ खास भेटवस्तू ; जाणून घ्या, मोदी काय म्हणाले?

Nanded Rain : मुखेडमध्ये ३०० जणांना वाचविले; नांदेडमध्ये पावसाचा धुमाकूळ, ९ जण बेपत्ता, म्हशींसह ७० जनावरे गेली वाहून

Eleventh Admission : अकरावीच्या ‘सर्वांसाठी खुल्या’ फेरीअंतर्गत प्रवेशासाठी २२ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

Pune News : नेत्यांची वेळ न मिळाल्याने पुण्यातील उड्डाणपुलांचे उद्‍घाटन रखडले

इतिहासाची अमूल्य खुण भारतात! इतिहासाशी पुन्हा जोडणारा क्षण, मुख्यमंत्री फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT