ITBP Recruitment 2022
ITBP Recruitment 2022 google
एज्युकेशन जॉब्स

ITBP Recruitment 2022 : दहावी उत्तीर्ण महिला-पुरुषांची आयटीबीपीमध्ये भरती

नमिता धुरी

मुंबई : इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलिस फोर्स (ITBP) ने कॉन्स्टेबल ग्रुप सी पदांच्या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. कॉन्स्टेबल पदांच्या भरतीसाठी अर्ज करू इच्छिणारे कोणतेही पुरुष किंवा महिला उमेदवार recruitment.itbpolice.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात.

या भरतीद्वारे कॉन्स्टेबल (पशु वाहतूक) ची 53 पदे भरली जातील. अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 सप्टेंबर 2022 आहे. (ITBP Group C Recruitment 2022)

ITBP कॉन्स्टेबल भरती 2022 रिक्त जागांचा तपशील

एकूण पदे- 53

पुरुष - 44 पदे

महिला – ८ पदे

वय मर्यादा

कॉन्स्टेबल पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 18 ते 25 वर्षे दरम्यान असावे.

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त संस्थेचे 10वी उत्तीर्ण प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

अधिसूचना ITBP गट C भरती 2022

अर्ज फी

सामान्य, OBC आणि EWS श्रेणीतील उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून 100 रुपये भरावे लागतील, तर SC, ST, माजी सैनिक आणि महिला उमेदवारांना कोणतेही अर्ज शुल्क भरावे लागणार नाही.

निवड प्रक्रिया

कॉन्स्टेबल पदांच्या भरतीसाठी उमेदवारांना तीन टप्प्यांतून जावे लागेल. पहिल्या टप्प्यात शारीरिक चाचणी, दुसऱ्या टप्प्यात 100 गुणांची लेखी परीक्षा आणि तिसऱ्या टप्प्यात उमेदवारांना कागदपत्रे पडताळणीच्या प्रक्रियेतून जावे लागेल.

असा करा अर्ज

१. - अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट recruitment.itbpolice.nic.in वर जा.

२. - त्यानंतर दुसऱ्या स्टेपमध्ये New Registration वर क्लिक करा आणि स्वतःची नोंदणी करा.

३. - नोंदणी केल्यानंतर, लॉगिन करा आणि कॉन्स्टेबल पदांसाठी अर्ज करा.

४. - अर्ज भरा आणि अर्ज फी भरून प्रक्रिया पूर्ण करा.

५. - शेवटी फॉर्म सबमिट करा आणि भविष्यातील वापरासाठी हार्ड कॉपी ठेवा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

Rinku Singh T20 WC 2024 : रोहितला जास्त पर्याय... रिंकू सिंहला वगळण्याबाबत अजित आगरकर काय म्हणाला?

Water On Moon : चंद्रावर अपेक्षेपेक्षा जास्त पाण्याचे साठे.... इस्त्रोने केला मोठा खुलासा

T20 WC 2024 Team India Squad : हार्दिकला कॅप्टन्सीवरून का हटवलं...? आगरकर गडबडला अन् रोहितनं सावरलं

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसामुळे आसामच्या काही भागांमध्ये पूर

SCROLL FOR NEXT