JEE Main Exam 2026
esakal
JEE Main Exam : राष्ट्रीय चाचणी संस्थेने (एनटीए) आज, १७ जानेवारी २०२६ रोजी त्यांच्या अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in वर संयुक्त प्रवेश परीक्षा (जेईई) मुख्य २०२६ सत्र १ परीक्षेचे प्रवेशपत्र जारी केले आहे. परीक्षेसाठी नोंदणी केलेले आणि प्रवेशपत्र जारी होण्याची वाट पाहणारे उमेदवार आता अधिकृत पोर्टलवर जाऊन त्यांचे हॉल तिकीट डाउनलोड करू शकतात. तसेच, प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी, उमेदवारांना त्यांचा अर्ज क्रमांक, पासवर्ड आणि सिक्योरिटी पिन टाकावा लागेल.
जर उमेदवारांनी त्यांच्या जेईई मेन प्रवेशपत्रात काही त्रुटी आढळल्यास, तत्काळ याबाबत एनटीएला कळवावे. असे न केल्यास नंतर त्यांना अडचण उद्भवू शकते. तसेच असेही सांगितले गेले आहे की, जेईई मेन प्रवेशपत्र २०२६ जारी झाल्यानंतर एनटीए जेईई वेबसाइट क्रॅश होऊ शकते. अशावेळी, कृपया थोडी वाट पाहावी, वेबसाईट रिफ्रेश करावी आणि पुन्हा प्रयत्न करावेत.
एनटीए २१ जानेवारी ते २९ जानेवारी २०२६ या कालावधीत देशभरातील आणि भारताबाहेरील १५ शहरांमध्ये नियुक्त केलेल्या परीक्षा केंद्रांवर दोन सत्रामध्ये जेईई मेन्स २०२६ सत्र १ परीक्षा आयोजित करेल. पहले सत्र सकाळी ०९ ते दुपारी १२ वाजेपर्यंत आणि दुसरे सत्र दुपारी ०३ ते संध्याकाळी ०६ वाजेपर्यंत असेल.
एनटीएने केवळ २१, २२, २३ आणि २४ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या परीक्षांसाठी जेईई मेन २०२६ सत्र १ प्रवेशपत्र जारी केले आहेत. तसेच, २८ आणि २९ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या परीक्षांसाठी प्रवेशपत्रे नंतर जारी केली जाणार आहेत.
त्याच वेळी, परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांना परीक्षेच्या दिवशी वेळेवर केंद्रावर पोहोचण्याच्या सूचना करण्यात आल्या असून आणि त्यांचे प्रवेशपत्र सोबत असणे अनिवार्य आहे. कारण, हॉल तिकिटशिवाय उमेदवारांना परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही.
पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदार ओळखपत्र, १२वीचे बोर्ड प्रवेशपत्र किंवा नोंदणी कार्ड, पासपोर्ट, आधार कार्ड ई-आधार, रेशन कार्ड, आधार नोंदणी क्रमांक फोटोसह. इतर सर्व ओळखपत्रांच्या प्रती, मोबाईलवर स्कॅन केलेले फोटो असले तरीही ते वैध ओळखपत्र पुरावा म्हणून मानले जाणार नाहीत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.