Government Jobs
Government Jobs esakal
एज्युकेशन जॉब्स

'येथे' B.Tech, BE पात्र उमेदवारांना JRF पदांवर नोकरीची संधी!

सकाळ वृत्तसेवा

ज्या उमेदवारांना या पदांसाठी ऑनलाइन अर्ज करावयाचा आहे ते अधिकृत वेबसाइटवर जाऊन तपशीलवार अधिसूचना तपासू शकतात.

संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (Defense Research and Development Organization - DRDO) - कॉम्बॅट व्हेईकल रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंटने (Combat Vehicles Research and Development Establishment - CVRDE) कनिष्ठ संशोधन फेलो (Junior Research Fellow - JRF) पदासाठी अर्ज मागविले आहेत. ज्या उमेदवारांना या पदांसाठी ऑनलाइन अर्ज करावयाचा आहे ते अधिकृत वेबसाइट rac.gov.in वर जाऊन तपशीलवार अधिसूचना तपासू शकतात. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, की त्यांनी अधिसूचना पूर्णपणे वाचल्यानंतरच अर्ज करावा; कारण अर्जामध्ये काही तफावत आढळल्यास अर्ज नाकारला जाईल. (Job opportunities for B.Tech and BE eligible candidates in JRF positions in DRDO)

जाणून घ्या शैक्षणिक पात्रता

JRF च्या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून BE किंवा B.Tech केलेले असावे. यासोबतच GATE स्कोअर अनिवार्य आहे. शैक्षणिक पात्रतेशी संबंधित अधिक माहितीसाठी उमेदवार अधिकृत अधिसूचना पाहू शकतात.

जाणून घ्या वयोमर्यादा

ज्युनिअर रिसर्च फेलोच्या पदांसाठी अर्ज करणाऱ्या अनारक्षित उमेदवारांचे वय 28 वर्षांपेक्षा जास्त नसावे. तसेच OBC (नॉन-क्रिमीलेयर) उमेदवारांचे वय 31 वर्षांपेक्षा जास्त नसावे. यासोबतच SC / ST उमेदवारांचे वय 33 वर्षे असावे.

उमेदवारांनी नोंद घ्यावी, की इच्छुक उमेदवार ही जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 30 दिवसांच्या आत (3 फेब्रुवारी 2022) rac.gov.in वर ऑनलाइन पद्धतीने अर्ज सबमिट करू शकतात. अर्ज भरल्यानंतर उमेदवारांनी भरलेल्या अर्जाची प्रत भविष्यातील संदर्भासाठी त्यांच्याकडे ठेवावी. तसेच, उमेदवारांनी हे लक्षात घ्यावे की स्क्रिनिंग टेस्ट आणि CBT / लिखित चाचणीला उपस्थित राहण्यासाठी त्यांची निवड झाल्यास कोणताही TA / DA दिला जाणार नाही.

अशी असेल निवड प्रक्रिया

ज्युनिअर रिसर्च फेलो पदासाठी उमेदवारांची अंतिम निवड स्क्रीनिंग टेस्ट आणि CBT / लिखित चाचणीमध्ये मिळालेल्या एकूण गुणांच्या आधारे केली जाईल. तर अर्जदार भरती प्रक्रियेशी संबंधित अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

HSC Exam Result : बारावीचा निकाल २.१२ टक्क्यांनी वाढला; कोकण विभागाचा सर्वाधिक ९७.५१

Narendra Modi : ... तर नेहरूंनी आरक्षणच दिले नसते

Pune News : विशाल अग्रवालसह चार जणांना अटक

Azamgarh Loksabha Election : ‘सप’च्या बालेकिल्ल्यात दोन यादवांमध्ये लढाई; धर्मेंद्र यादव विरुद्ध दिनेशलाल निरहुआ

Milind Deora : उद्धव ठाकरेंमुळे काँग्रेस पक्ष सोडला

SCROLL FOR NEXT