Anjali_Birla 
एज्युकेशन जॉब्स

UPSC परीक्षेत 'बॅकडोअर एन्ट्री'मुळे ट्रोल झालेल्या अंजली बिर्लाने दिलं उत्तर, काय म्हणाली वाचा

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : लोकसभा सभापती ओम बिर्ला (Om Birla) यांची कन्या अंजली बिर्ला (Anjali Birla) ही गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियात खूप ट्रोल होत आहे. नागरी सेवा परीक्षेत बॅकडोअर एन्ट्री मिळाल्याने तिला ट्रोल करण्यात येत आहे. यामुळे गेल्या काही दिवसांपासून याविषयावर मौन बाळगलेल्या अंजलीने ट्रोलर्सना अखेर उत्तर दिलं आहे. 

NDTV या हिंदी वृत्तसंस्थेशी बोलताना अंजली म्हणाली, 'नागरी सेवा परीक्षा न देताच मला यश मिळाल्याच्या अफवांचा मला सुरवातीला खूप त्रास झाला. पण यापुढे मला सार्वजनिक क्षेत्रातच काम करायचं आहे. ट्रोलिंगविरोधातही कायदा व्हायला हवा. खोट्या बातम्या पसरवणाऱ्या लोकांना जबाबदरा ठरवून त्यांची ओळख सर्वांना व्हायला हवी. आज मी याची बळी पडली आहे, उद्या आणखी कोणतीही व्यक्ती या समस्येची बळी ठरेल.

२३ वर्षीय अंजलीने पहिल्याच प्रयत्नात या कठीण परीक्षेत यश मिळवलं आहे. नागरी सेवा परीक्षा २०१९च्या मुख्य परीक्षेच्या मेरिट लिस्टमध्ये अंजलीचं नाव आहे. पण सोशल मीडियावर अंजलीने तिच्या वडिलांच्या पदाचा फायदा घेत बॅकडोअर एन्ट्री घेतली आहे, अशी जोरदार चर्चा होत होती. 

याविषयी बोलताना अंजली म्हणाली, परीक्षा दिल्यानंतरही आपण या परीक्षेचा अभ्यास केला आहे, हे सांगायला लागणे या गोष्टीचा मला धक्का बसला. पण या आरोपांमुळे मला आणखी बळ मिळाले, कारण आयुष्यात मला अशा प्रकारच्या टीकांचा सामना यापुढेही करावा लागणार आहे. या ट्रोलिंग प्रकरणाने मला माणूस म्हणून आणखी परिपक्व बनवले आहे. 

अंजली पुढे म्हणाली, 'मी पूर्णवेळ स्वत:शी प्रामाणिक राहिले. मी किती कष्ट घेतले आहेत, हे माझ्या जवळच्या मित्रांना माहित आहे.' ट्रोलिंगच्या पार्श्वभूमीवर अंजलीने एक पोस्ट लिहली होती, त्यामध्ये तिने म्हटले आहे की, 'यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेसची परीक्षा ही एक वर्षभर चालणारी प्रक्रिया असून ती तीन टप्प्यात घेतली जाते आणि जेव्हा तुम्ही या तीनही टप्प्यात यशस्वी होता, तेव्हाच तुम्ही अधिकारी बनू शकता.

UPSC CSE ही एक स्वच्छ आणि पारदर्शक प्रक्रियेसाठी ओळखली जाते, तेथे 'बॅकहँड एन्ट्री' असं काही नाही, त्यामुळे कृपया या संस्थेचा तरी आदर करा.' यावेळी अंजलीने तिने तिन्ही टप्पे पार केल्याबाबतची कागदपत्रेही सादर केली आहेत.

- एज्युकेशन जॉब्ससंबंधी बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cyber Scam: ‘वॉटर बिल अपडेट करा अन्यथा पाणी बंद’ अशा धमकीने; उद्योजकाला ५४ लाखांचा गंडा

CM Devendra Fadnavis: रस्ता रुंदीकरणाला पाठिंबा; मुख्यमंत्री फडणवीस; गरज असेल तिथे भूसंपादन

Illegal Sand Mining: सुखना नदीतून वाळू उपसा करणारे जेरबंद; पाचजणांवर गुन्हा; पाच ट्रॅक्टरसह तीस लाखांचा मुद्देमाल जप्त

Manmad News : इंदूर-पुणे महामार्गावर कंटेनर अपघात; मनमाडजवळ वाहतुकीचा खोळंबा, प्रवाशांचे हाल

Latest Marathi News Updates : पालकमंत्री अतुल सावे यांची गाडी गावकऱ्यांनी अडवली

SCROLL FOR NEXT